मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ‘संभाजीनगरातला राडा भाजप आणि एमआयएमनेच घडवला, यांना फक्त दंगली हव्या’, अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप

‘संभाजीनगरातला राडा भाजप आणि एमआयएमनेच घडवला, यांना फक्त दंगली हव्या’, अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 30, 2023 11:48 AM IST

Ambadas Danve on Kiradpura Dangal : संभाजी नगर येथे रात्री दीडच्या सुमारास राम मंदिरा समोर दोन गटात राडा झाला. यात पोलिसांची वाहने पेटवण्यात आली. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, या राड्यावर आता राजकीय शेरेबाजी होत आहे. या घटनेमागे भाजप आणि एमआयएम आहे असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.

Ambadas Danve On BJP
Ambadas Danve On BJP (HT)

संभाजी नगर : संभाजी नगर येथे काल रात्री दीडच्या सुमारास दोन गटात मोठा राडा झाला. किराडपुरा येथील राममंदीरा समोर दोन गट भिडले. यात पोलिसांच्या आणि काही गाड्या पेटवून देण्यात आल्या. यामुळे शहरात तणाव पूर्ण वातावरण आहे. पोलिसांनी अफवांवर विश्वास ठेऊ नका असे आवाहन केले आहे. गैर प्रकार होऊ नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अनेक राजकीय नेते या ठिकाणी भेटी देत आहेत. पालकमंत्री संदिपांन भूमरे यांनी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. तर विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते रामदास दानवे यांनी देखील या ठिकाणी येत शांततेचे आवाहन केले. दरम्यान, या घटनेमागे भाजप आणि एमआयएमचा हात असून त्यांना केवळ दंगली हव्या असा आरोप त्यांनी केला आहे. भाजप आणि एमआयएमचा जनाधार कमी होतोय, त्यामुळेच शहरातील वातावरण बिघडवले जात असल्याचे देखील दानवे म्हणाले.

संभाजी नगर येथील किराडपुरा येथील राड्यानंतर या ठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे. पोलिस या प्रकारामागे कोण आहेत त्यांचा शोध घेत असून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान, अंबादास दानवे यांनी आज सकाळी शहरातील दंगलग्रस्त भागाची पाहणी केली. रावसाहेब दानवे म्हणाले, परिसरात काल रात्री झालेला राडा कुणी घडवला, हे शोधून काढा. शहरातल्या लोकांच्या मनात विष पेरण्यासाठी भाजप आणि एमआयएम जबाबदार आहे. या दोन्ही पक्षाचा जनाधार कमी होत असल्याने त्यांना दंगल हवी आहे. मतांसाठी हे राजकारण सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

गेल्या महिनाभरापासून औरंगाबाद शहराचं छत्रपती संभाजीनगर नामांतरावरून सुरु असलेल्या आंदोलनामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप देखील दानवे यांनी यावेळी केला. हे का घडलं, घडवणारे कोण यामागे आहेत हे तपासण्याची आवश्यकता आहे. मागच्या महिनाभरापासून आम्ही आवाहन करत आहोत. शहराचं वातावरण अशांत करून जनतेच्या मनात विष पेरण्याचा प्रयत्न चालू आहे.

दरम्यान, पालक मंत्री संदीपान भुमरे यांनी देखील घटनास्थळाची पाहणी करत दंगल घडवणाऱ्या समाजकंटकांना थारा मिळणार नसून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.

IPL_Entry_Point

विभाग