मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Daund News : खेळता खेळता टाकीत पडल्याने पाच वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू; दौंड तालुक्यातील घटना
अभय रामदास दोरगे
अभय रामदास दोरगे

Daund News : खेळता खेळता टाकीत पडल्याने पाच वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू; दौंड तालुक्यातील घटना

30 March 2023, 11:56 ISTNinad Vijayrao Deshmukh

five year old girl died in Daund : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात भांडगाव येथे पाण्याच्या टाकीत पडून एका पाच वर्षीय चिमूकल्याचा मृत्यू झाला.

पुणे: घरात लहान मुले असले की, त्यांच्यावर लक्ष ठेवणे गरजेचे असते. त्यांच्याकडे दुर्लक्ष केले की अनर्थ घडू शकतो. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात भांडगाव येथे मुलाकडे दुर्लक्ष केल्याने पाच वर्षीय चिमूकल्याचा मृत्यू झाला आहे. घरात खेळत असतांना पाण्याच्या टाकीत पडून ५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अभय रामदास दोरगे (वय ५ वर्ष ६ महिने) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी घडली. भांडगाव येथे राहणारे रामदास दोरगे यांचा पोल्ट्री फार्म आहे. त्यांना अक्षय आणि अभय ही दोन मुले असून ती घरासमोर खेळत होती. या पोल्ट्री फार्ममध्ये पाच फुट खोल टाकी आहे. दरम्यान, दोरगे यांची दोन्ही मुले ही पोल्ट्री फार्म समोर खेळत होती. खेळता खेळता अक्षय आणि अभय पाण्याच्या टाकीकडे गेली.

त्यातील लहान मुलगा अभय हा पाण्याच्या टाकीकडे गेला. यावेळी घरातील कोणाचेच त्याच्याकडे लक्ष नव्हते. अभय हा पाण्याच्या टाकीजवळ आला आणि त्याने टाकीत डोकावले. यावेळी त्याचा तोल गेल्याने पाण्याच्या टाकीत आपटून त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घरच्यांच्या लक्षात आल्याने दोरगे यांनी तातडीने मुलाला दवाखान्यात नेले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलिसांनी देखील घटनास्थळी येत पाहणी केली आहे. अभयच्या अशा अचानक जाण्याने दोरगे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

 

विभाग