मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  MNS vs PFI : पीएफआयचं ऑफिस फोडणाऱ्या मनसैनिकांवर औरंगाबादेत गुन्हे दाखल

MNS vs PFI : पीएफआयचं ऑफिस फोडणाऱ्या मनसैनिकांवर औरंगाबादेत गुन्हे दाखल

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 26, 2022 11:26 AM IST

Aurangabad Crime News : पीएफआयच्या कार्यालयांवर धाड टाकण्यात आल्यानंतर पोलिसांनी शहरात जमावबंदीचे आदेश दिले होते. त्यानंतरही मनसैनिकांनी आंदोलन केल्यानं पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

Aurangabad Crime News
Aurangabad Crime News (HT)

Aurangabad Crime News : ईडी आणि एनआयएनं पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडियाच्या देशभरातील कार्यालयांवर छापेमारी केली होती. त्यानंतर पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी अनेक शहरांमध्ये आंदोलन केलं होतं. पुण्यात पीएफआयनं केलेल्या आंदोलनात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्याचा दावा करण्यात आल्यानंतर काल औरंगाबादेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी पीएफआयचं कार्यालयावर हल्ला केला होता. त्यानंतर आता या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

औरंगाबादेत मनसेनं केलेल्या आंदोलनानंतर सिडको पोलिसांनी मनसैनिकांवर जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळं आता मनसेला मोठा धक्का बसला आहे. कालच्या आंदोलनानंतर पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर त्यांच्याकडून एक फॉर्म भरल्यानंतर मनसैनिकांना सोडून देण्यात आलं होतं. त्यानंतर आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीएफआयच्या कार्यालयात तोडफोक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी आधीच मिळाली होती. त्यामुळं पोलिसांनी शहरातील पीएफआयच्या कार्यालयात मोठा बंदोबस्त तैनात केला होता. त्यानंतर पोलिसांनी शहरातील मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं.

पीएफआयच्या कारवाईनं शहरात खळबळ...

काही दिवसांपूर्वी देशभरात पीएफआयच्या कार्यालयांवर तपास यंत्रणांनी छापेमारी केली होती. त्यावेळी औरंगाबाद शहरातील पीएफआयच्या कार्यालयावरही छापा मारण्यात आला होता. त्यामुळं औरंगाबाद शहरात खळबळ उडाली होती. त्यानंतर आता मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्यानं राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.

IPL_Entry_Point