मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pro Pakistan Slogans : पुण्यातील ‘त्या’ व्हायरल व्हिडिओची होणार फॉरेन्सिक तपासणी

Pro Pakistan Slogans : पुण्यातील ‘त्या’ व्हायरल व्हिडिओची होणार फॉरेन्सिक तपासणी

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 26, 2022 10:52 AM IST

Pro Pakistan Slogans In Pune : पीएफआयवर तपास यंत्रणांनी केलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी पुण्यात आंदोलन करण्यात आलं होतं. त्यात आक्षेपार्ह घोषणा देण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता.

Pro Pakistan Slogans In Pune
Pro Pakistan Slogans In Pune (HT)

Pro Pakistan Slogans In Pune : काही दिवसांपुर्वी ईडी आणि एनआयएनं देशभरात छापेमारी करून पीएफआयच्या नेत्यांना अटक केली होती. त्यानंतर या कारवाईचा निषेध करण्यासाठी पुण्यात पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात आंदोलकांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यानंतर आता या व्हायरल व्हिडिओची सत्यता तपासण्यासाठी त्याची फॉरेन्सिक तपासणी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

पीएफआयच्या आंदोलनात आक्षेपार्ह घोषणा देण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पुण्यासह राज्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांनीही हा दावा खोटा असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आता या व्हिडिओची सत्तता तपासण्यासाठी फॉरेन्सिक चाचणी केली जाणार आहे.

पीएफआय कार्यकर्त्यांवर देशद्रोहाचा गुन्हा नाही...

पीएफआयनं पुण्यात केलेल्या आंदोलनात देशविरोधी घोषणांबाबत पीएफआय कार्यकर्त्यांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला नाही. कारण काही दिवसांपूर्वीच पूर्ण चौकशी झाल्याशिवाय आरोपीवर पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करू नये, असा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिला होता. त्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणात पोलिसांनी चिथावणीखोर वक्तव्यं करणं, कट आखणं आणि सरकारी कामात अडथळा आणण्याच्या कलमांखाली आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

IPL_Entry_Point