मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Kullu Bus Accident : हिमाचलमध्ये बस दरीत कोसळल्यानं सात पर्यटकांचा मृत्यू; १० जखमी
Bus accident in kullu himachal today
Bus accident in kullu himachal today (HT)

Kullu Bus Accident : हिमाचलमध्ये बस दरीत कोसळल्यानं सात पर्यटकांचा मृत्यू; १० जखमी

26 September 2022, 9:44 ISTAtik Sikandar Shaikh

Kullu Bus Accident : अपघातग्रस्त बस पर्यटकांना घेऊन जात होती. त्यावेळी हा भीषण अपघात झाल्यानं सात जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

Bus accident in kullu himachal today : पर्यटकांना घेऊन जात असलेली बस खोल दरीत कोसळल्यानं सात लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील घियाघीजवळ झालेल्या या अपघातात दहा जण गंभीर जखमी झाले असून त्यानंतर प्रशासनानं मदत व बचावकार्य सुरू केलं आहे. काल संध्याकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली आहे. भाजप आमदार सुरेंदर शौरी यांनी हा अपघात झाल्याची माहिती फेसबुक लाईव्हद्वारे लोकांना दिली. मृतांमध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा आणि दिल्ली या राज्यांतील पर्यटकांचा समावेश आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, २० ते २५ पर्यटकांनी ही बस घेऊन जात होती. कुल्लू जिल्ह्यातील घियाघीजवळ येताच अचानक बस खोल दरीत कोसळली. यावेळी अपघाताचा आवाज आल्यानं स्थानिकांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त लोकांना मदत करायला सुरुवात केली. त्यात सात जणांचा जागीच मृत्यू झालेला होता. तर दहा पेक्षा जास्त लोकांना गंभीर दुखापत झालेली होती.

त्यानंतर स्थानिकांनी या घटनेची माहिती जिल्हा प्रशासनाला दिली. स्थानिक लोक आणि प्रशासनानं तातडीनं मदत व बचावकार्य करत जखमींना रुग्णालयात दाखल केलं आहे. पर्यटकांच्या या बसला अपघात का झाला, यात कुणाची चूक होती का, हे अजून समजू शकलेलं नाही. ड्रायव्हरचं बसवरील नियंत्रण सुटल्यानंच हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

विभाग