मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Govinda Injury: दहीहंडी फोडताना मुंबईत १५३ गोविंदा जखमी; ठाण्यातही आकडा वाढला!

Govinda Injury: दहीहंडी फोडताना मुंबईत १५३ गोविंदा जखमी; ठाण्यातही आकडा वाढला!

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Aug 20, 2022 10:44 AM IST

Govinda Injury in Mumbai thane dahi handi : मुंबईत आणि ठाण्यात दहीहंडी फोडताना अनेक गोविंदा जखमी झाले असून काहींवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

Dahi Handi in Mumbai And Thane
Dahi Handi in Mumbai And Thane (HT_PRINT)

Govinda Injured in Mumbai thane dahi handi : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त काल राज्यात दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला. मुंबई पु्ण्यासह अनेक ठिकाणी आठ किंवा नऊ थर रचून दहीहंडी साजरी करण्यात आली आहे. त्यामुळं दहीहंडी पाहण्यासाठी अनेक ठिकाणी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. परंतु आता मुंबईत दहीहंडी फोडताना तब्बल १५३ गोविंदा जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

बीएमसीनं जारी केली माहिती....

बृहन्मुंबई महापालिकेनं दिलेल्या माहितीनुसार, दहीहंडी फोडत असताना झालेल्या विविध घटनांत शहरात १५३ गोविंदा जखमी झाले आहेत. त्यापैकी १३० लोकांचा तात्काळ उपचार केल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून २३ गोविंदांवर उपचार सुरू आहे. याशिवाय काल ठाण्यातही दहीहंडी मोठ्या उत्सवात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. आता त्यातही ६४ गोविंदा जखमी झाल्याची माहिती ठाणे महापालिकेनं दिली आहे.

दरम्यान ठाण्यातील टेंभी नाका परिसरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी अभिनेत्री श्रद्धा कपूर हिनं देखील हजेरी लावली होती. याशिवाय मुख्यमंत्र्यांनी रात्री साडेअकरा वाजता मानकोली वेलेगाव ते डोंबिवली असा बोटीनं प्रवास करून दीपेश म्हात्रे फाउंडेशननं आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवाला हजेरी लावली. त्यामुळं मुंबईत दहीहंडीचा उत्सव रात्री उशिरापर्यंत सुरू होता.

IPL_Entry_Point

विभाग