मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai News : विचित्र अतिक्रमण! शेजाऱ्यांच्या घरावरच बांधली गॅलरी; वारंवार तक्रार करूनही बीएमसीचा कानाडोळा

Mumbai News : विचित्र अतिक्रमण! शेजाऱ्यांच्या घरावरच बांधली गॅलरी; वारंवार तक्रार करूनही बीएमसीचा कानाडोळा

HT Marathi Desk HT Marathi
Apr 26, 2023 06:54 PM IST

encroachment case in Powai : मुंबईच्या पवई येथील एका चाळीत अतिक्रमण व अनधिकृत बांधकामाचा विचित्र प्रकार समोर आला आहे.

Powai Encroachment Case
Powai Encroachment Case

encroachment case in Powai : मुंबईत मोकळ्या जागांवर होणारी अतिक्रमणे, त्याबाबतच्या तक्रारी व कारवाया हे नवीन नाही. मात्र, दोन शेजाऱ्यांच्या घरांच्या छपरावर तिसऱ्यानं स्वत:च्या घराची गॅलरी बांधण्याचा प्रकार बहुधा पहिलाच असावा. पवईतील तुंगा गावात असं प्रत्यक्षात घडलं असून मुंबई महापालिकेकडं रीतसर तक्रार करूनही त्याची साधी दखलही कोणी घेतलेली नाही.

पवईतील राजे संभाजी नगर, लेक बूम बिल्डिंग शेजारच्या रमेश चाळीत हे अनधिकृत बांधकाम करण्यात आलं आहे. लक्ष्मी शेजूळ व आशा शिंदे यांच्या घराच्या छपरावर त्यांचे शेजारी विल्यम पास्तो यांनी बांधकाम केलेलं आहे. वास्तविक पास्तो हे सदर चाळीत राहत नाहीत. ते इतरत्र राहतात. मात्र, ते आपलं घर दुमजली करत आहेत. घर दुमजली करण्यास कोणाचाही काहीच आक्षेप नाही. मात्र, घराची गॅलरी थेट दुसऱ्याच्या घरावर काढणं हे कितपत योग्य आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

BMC Swimming Pool : मुंबईकरांना सहा तलावांमध्ये मिळणार पोहण्याचं प्रशिक्षण, बीएमसीचा अनोखा उपक्रम

मोहन राठोड हे कंत्राटदार पास्तो यांच्या घराचं काम करत आहेत. आम्ही BMC ला घाबरत नाही. तुम्हाला जी तक्रार करायची आहे ती करा, अशी दमदाटी ते शिंदे यांना करत आहेत. दरवाजाला बाहेरून लॉक करून आतमध्ये घराच्या स्लॅब वरून माणसं पाठवून कामं केलं जात आहे, अशी माहिती आशा शिंदे यांचे सुपुत्र शिरीष शिंदे यांनी दिली.

BMC complaint copy
BMC complaint copy

शिंदे व शेजूळ यांनी सर्वप्रथम पोलिसांकडं तक्रार केली. पोलिसांनी संबंधित पास्तो यांना समज दिली. मात्र, त्यांनी मनमानी सुरूच ठेवली. त्यामुळं शिंदे व शेजूळ यांनी ७ डिसेंबर २०२२ रोजी मुंबई महापालिकेच्या एल विभाग कार्यालयात अतिक्रमणाची पहिली तक्रार केली. आता त्या तक्रारीला चार महिने उलटून गेल्यानंतरही महापालिकेनं कुठलीही कारवाई केलेली नाही. त्यामुळं त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

IPL_Entry_Point

विभाग