मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  BMC Swimming Pool : मुंबईकरांना सहा तलावांमध्ये मिळणार पोहण्याचं प्रशिक्षण, बीएमसीचा अनोखा उपक्रम

BMC Swimming Pool : मुंबईकरांना सहा तलावांमध्ये मिळणार पोहण्याचं प्रशिक्षण, बीएमसीचा अनोखा उपक्रम

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Apr 26, 2023 01:19 PM IST

Swimming Lakes In Mumbai : लोकांना पोहण्याचं प्रशिक्षण देण्यासाठी मुंबई महापालिकेने अनोखी योजना आणली आहे.

bmc swimming pool online membership
bmc swimming pool online membership (HT)

bmc swimming pool online membership : उन्हाळ्यात उकाड्याने सामान्य मुंबईकर हैराण झालेले असतानाच आता बीएमसीने लोकांना पोहणं शिकवण्यासाठी अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. पोहण्याच्या माध्यमातून लोकांना व्यायामाची सवय लावण्यासाठी बीएमसीतर्फे मुंबईतील सहा जलतरण तलावात नागरिकांना शास्त्रशुद्ध पद्धतीनं प्रशिक्षण देण्यात येणार आहे. येत्या दोन मे पासून पोहण्यासाठी नागरिकांना नोंदणी करता येणार आहे. त्यामुळं आता ज्या लोकांना पोहणं शिकायचं असेल त्यांच्यासाठी मुंबई महानगरपालिकेने प्रशिक्षणाची संधी दिली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिकेचे ६ तरण तलाव मुंबईकरांच्या सेवेत कार्यरत आहे. पोहण्याची इच्छा असणाऱ्या मुंबईकरांना बृहन्मुंबई महानगरपालिकेने यंदाच्या उन्हाळ्यात अशी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

पालिकेच्या सहा जलतरण तलावांमध्ये येत्या २ मे २०२३ पासून २१ दिवसांचे प्रशिक्षण सुरू करण्यात येत आहे. बीएमसीचे आयुक्त इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले आहेत. प्रशिक्षणासाठीची नाव नोंदणी पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार असून त्यासाठीची लिंक जारी करण्यात आली आहे. 'प्रथम येणाऱ्या पहिल्यांदा प्रवेश' या पद्धतीने लोकांना प्रशिक्षणाची संधी देण्यात येणार आहे. त्यामुळं इच्छुकांनी आपला प्रवेश शक्य तेवढ्या लवकर घेण्याचं आवाहन माहिती उप आयुक्त किशोर गांधी यांनी केलं आहे.

BAMU Rape Case : प्राध्यापकानेच केला विद्यार्थीनीवर बलात्कार, मराठवाडा विद्यापीठातील संतापजनक घटना

मुंबईत माफक शुल्कात म्हणजेच पंधरा वर्षांपर्यंत दोन हजार रुपये, त्या पुढील वयोगटासाठी तीन हजार रुपयांच्या माफक शुल्कात प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. जलतरण प्रशिक्षण हे २१ दिवसांचे असणार आहे. जलतरणाच्या नोंदणीसाठी पालिकेकडून https://swimmingpool.mcgm.gov.in/ ही लिंक जारी करण्यात आली आहे. प्रशिक्षण कालावधींमध्ये सहा जलतरण तलावात सहा हजार प्रशिक्षणार्थींना नोंदणी करता येणार असून यामुळे मोठ्या संख्येने मुंबईकर नागरिकांना जलतरणाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेणे शक्य होणार आहे. प्रशिक्षणासाठी नोंदणी करणाऱ्या लोकांना वैद्यकीय प्रमाणपत्र, पालकांचे प्रतिज्ञापत्र आणि पेमेंट केल्याची पावती जमा करणं आवश्यक असणार आहे.

कोणत्या तलावांत होणार प्रशिक्षण कार्यक्रम?

दादरमधील महात्मा गांधी स्मारक जलतरण तलाव, चेंबूरमधील जनरल अरूणकुमार वैद्य जलतरण तलाव, कांदिवलीतील सरदार वल्लभभाई पटेल जलतरण तलाव, मालाडमधील मनपा जलतरण तलाव, दहिसरमधील मुरबाळीदेवी जलतरण तलाव आणि मास्टटरशेफ हॉटेल समोरील मनपाच्या जलतरण तलावात लोकांना पोहण्याचं प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

WhatsApp channel