Bageshwar Dham Hirendra Shastri Controversial Statement On Sant Tukaram Maharaj : दिव्यशक्तीचा दावा करून महाराष्ट्रासह देशभरात चर्चेत आलेले बागेश्वर धामच्या हितेंद्र शास्त्रींनी संत तुकाराम महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य करून नवा वाद ओढवून घेतला आहे. संत तुकाराम महाराजांची पत्नी त्यांना रोज मारत होती, असं म्हणत हितेंद्र शास्त्री यांनी नव्या वादाला तोंड फोडलं आहे. त्यामुळं आता हितेंद्र शास्त्रींच्या नव्या वक्तव्यावरून महाराष्ट्रात राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे. दिव्यशक्तीचा दावा केल्यानंतर अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे श्याम मानव यांनी हितेंद्र शास्त्रींना चमत्कार करून दाखवण्याचं ओपन चँलेंज केलं होतं. हितेंद्र यांनी चँलेज स्वीकारून त्यांना रायपूरमध्ये येण्याची अट घातली होती. परंतु अंनिसनं कार्यक्रम महाराष्ट्रात झाला पाहिजे, अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर आता तो वाद शमतोच नाही तर धिरेंद्र शास्त्रींनी नव्या वादाला फोडणी दिली आहे.
नेमकं काय म्हणाले धिरेंद्र शास्त्री?
महाराष्ट्रातील संत असलेल्या तुकाराम महाराजांना त्यांची पत्नी रोज काठीनं मारत होती. रोज बायकोचा मार खाता, लाज नाही का वाटत?, असा प्रश्न एकानं केल्यानंतर संत तुकाराम म्हणाले की, मला मारहाण करणारी बायको मिळणं ही देवाचीच कृपा आहे. मारहाण करणारी बायको मिळाल्यामुळं मला देवाची सेवा करण्याची संधी मिळते, असं तुकारामांनी म्हटल्याचा दावा धिरेंद्र शास्त्री यांनी केला आहे. त्यामुळं आता त्यांच्या या नव्या वादग्रस्त वक्तव्यामुळं राजकीय वादंग पेटलं आहे.
हितेंद्र शास्त्री यांनी संत तुकाराम महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर भाजपचे नेते तुषार भोसले यांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. हितेंद्र शास्त्री यांच्या वक्तव्यामुळं केवळ वारकरी संप्रदायाचा नाही तर महाराष्ट्राचा अपमान झाला असून त्यामुळं त्यांनी तातडीनं माफी मागावी, अशी मागणी तुषार भोसले यांनी केली आहे. बागेश्वर धामच्या हितेंद्र शास्त्रींनी संत तुकाराम महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं असेल तर ते बंद करा. संत तुकाराम महाराजांबाबत कुणी काहीही बोलत असेल तर खपवून घेतलं जाणार नाही, असं म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे.
संबंधित बातम्या