मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ajit Pawar : आता बोलणार नाही, पुण्याचा निकाल येऊ द्या, मग सांगतो; अजित पवारांनी सुनावलं

Ajit Pawar : आता बोलणार नाही, पुण्याचा निकाल येऊ द्या, मग सांगतो; अजित पवारांनी सुनावलं

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Feb 28, 2023 08:22 PM IST

Ajit Pawar taunt Shinde Fadnavis govt in Vidhan Sabha : पदवीधर, शिक्षक मतदारसंघाचा निकाल व पुण्यात प्रचारातील घडामोडींचा उल्लेख करत अजित पवार यांनी आज सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला.

Ajit Pawar
Ajit Pawar

Ajit Pawar on Pune Bypoll result : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला झालेल्या राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत भाग घेताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज जोरदार टोलेबाजी केली. राज्यातील सरकारच्या वेगवेगळ्या दाव्यांची त्यांनी पोलखोल केली. इतके दिवे लावले असते तर पदवीधर आणि शिक्षक मतदारांनी तुम्हाला नाकारलं नसतं, असे खडे बोलही अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले.

ट्रेंडिंग न्यूज

राज्यपालांच्या अभिभाषणात अनेक आश्वासनांची पूर्ती झाल्याचा दावा करण्यात आला होता. त्यावर अजित पवार यांनी असहमती दर्शवली. शिंदे फडणवीस सरकारला सहा महिने झाल्यानंतर राज्यात पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका झाल्या. सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या मतदारांनी यात मतदानं केलं. त्यांनी सत्ताधाऱ्यांना अशी चपराक दिलीय की ते नाउमेद झालेत. केवळ एका भागात नाही, तर जवळपास सर्वच भागांत सत्ताधाऱ्यांचा पराभव केलाय. कोकणातील जागा भाजपला मिळाली असली तरी ते मतदान भाजपला झालेलं नाही. तिथं शिवसेनेचाच उमेदवार भाजपनं आयात केला होता. त्या उमेदवाराला महाविकास आघाडीनं तिकीट दिलं असतं तर तिथंही पराभव झाला असता, याकडं अजित पवार यांनी लक्ष वेधलं.

'कुठलंही काम न करता आम्ही हे केलं, ते केलं असं सांगितलं जातंय. पण खरोखरच यांनी दिवा लावला असता तर त्यांना पदवीधर व शिक्षकांनी निवडून दिलं असतं. त्यांना सपशेल नाकारलंय, असं अजित पवार म्हणाले.

पुणे पोटनिवडणुकीचा उल्लेख करून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर पुन्हा निशाणा साधला. 'पुण्याच्या पोटनिवडणुकीचा निकाल लागला तर आहे तेही जाईल, असं अजितदादा म्हणाले. 'पुण्याचा निकाल काय लागेल माहीत नाही. मतदारांच्या मनात काय आहे सांगता येत नाही. मी मतदारांचा आदरच करतो. पण पुण्यात सरकारमधील सगळ्या नेत्यांना तीन-तीन, चार-चार दिवस बसावं लागलं. काय काय घडलं. तिथं कोण काय करत होतं. मतदानाला जाताना कोणाला काय सांगितलं जात होतं. आज मी बोलणार नाही, एकदा निकाल लागू द्या मग सांगतो, असा इशारा अजित पवार यांनी दिला.

IPL_Entry_Point

विभाग