मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sinhagad Khadakwasa Close : सिंहगड किल्ला आणि खडकवासला चौपाटी पर्यटकांसाठी बंद, नेमकं कारण काय?

Sinhagad Khadakwasa Close : सिंहगड किल्ला आणि खडकवासला चौपाटी पर्यटकांसाठी बंद, नेमकं कारण काय?

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 15, 2023 09:39 AM IST

sinhagad fort close : पुण्यातील खडकवासला चौपाटी आणि सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे.

Sinhagad Khadakwasa Close In Pune City
Sinhagad Khadakwasa Close In Pune City (HT)

Sinhagad Khadakwasa Close In Pune City : पुण्यातील प्रसिद्ध खडकवासला धरणाची चौपाटी आणि सिंहगड किल्ला उद्या दुपारपर्यंत पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय पुणे जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे पुण्यातील डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीला भेट देणार आहे. त्यांच्या दौऱ्यापूर्वी सुरक्षेच्या कारणास्तव दोन्ही पर्यटनस्थळं बंद करण्यात आले आहे. उद्या दुपारपर्यंत खडकवासला धरण आणि सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद असणार आहे. वनविभाग आणि हवेली पोलिसांनी या निर्णयाची कठोर अंमलबजावणी सुरू केली आहे. परंतु आता अचानक दोन्ही पर्यटनस्थळं बंद करण्यात आल्यामुळं अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे पुणे दौऱ्यावर येणार आहे. यावेळी ते खडकवासला धरणाला लागून असलेल्या डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीला (DIAT) भेट देणार देतील. खडकवासला आणि सिंहगड किल्ल्याला भेट देण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. अशावेळी परिसरात मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असते. त्यामुळं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या दौऱ्यात कोणतीही अडचण होऊ नये, यासाठी प्रशासनाने सिंहगड किल्ला आणि खडकवासला धरणाची चौपाटी पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

सिंहगड रोडवरील वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. कोणतीही वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहे. त्यामुळं नागरिकांनी सहकार्य करावं, असं आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात आलं आहे. सिंहगड किल्ल्यावरील मार्ग बंद झाल्यामुळं पर्यटकांची मोठी गैरसोय होणार आहे. त्यानंतर आता सिंहगड रोड तसेच खडकवासला परिसरात पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

IPL_Entry_Point