मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Andheri Bypoll 2022 : महिलेला त्रास देणाऱ्या गद्दारांविरोधात आम्हीच जिंकणार, आदित्य ठाकरेंचा घणाघात

Andheri Bypoll 2022 : महिलेला त्रास देणाऱ्या गद्दारांविरोधात आम्हीच जिंकणार, आदित्य ठाकरेंचा घणाघात

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 14, 2022 01:26 PM IST

Aditya Thackeray vs Eknath Shinde : अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत आज शिवसेनेकडून ऋतुजा लटके यांचा उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे. त्यापूर्वी आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंवर सडकून टीका केली आहे.

Aditya Thackeray vs Eknath Shinde On Andheri Bypoll 2022
Aditya Thackeray vs Eknath Shinde On Andheri Bypoll 2022 (HT)

Aditya Thackeray vs Eknath Shinde On Andheri Bypoll 2022 : हायकोर्टाच्या आदेशानंतर आज सकाळी मुंबई महापालिकेनं अंधेरी पूर्व विधानसभेतील शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटकेंचा राजीनामा मंजूर केला आहे. त्यानंतर आज शिवसेनेच्या वतीनं त्यांचा उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे. परंतु आता बीएमसीनं लटकेंच्या राजीनाम्याला विलंब लावल्याच्या कारणावरून शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह भाजपवर जोरदार हल्ला केला आहे.

माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ऋतुजा लटकेंचा राजीमाना न स्वीकारण्यासाठी खोके सरकारनं मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणला होता. त्यांनी एका महिलेला त्रास दिला, हे घाणेरडं राजकारण आहे. आमची लढाई ही गद्दार वृत्तीच्या लोकांविरुद्ध आहे, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर सडकून टीका केली आहे. याशिवाय शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटकेंचा मोठ्या मताधिक्यानं विजय होईल, असं दावाही आदित्य ठाकरेंनी केला.

ऋतुजा लटके आज भरणार उमेदवारीचा अर्ज...

बीएमसीनं नोकरीचा राजीनामा स्वीकारल्यानंतर आता आज शिवसेनेकडून ऋतुजा लटकेंचा उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे. त्यावेळी शिवसेनेच्या अनेक नेत्यांसह मोठ्या संख्येनं शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत.

भाजपचं मुंबईत मोठं शक्तिप्रदर्शन...

भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार मुरजी पटेल यांनी आज उमेदवारीचा अर्ज दाखल करताना मोठं शक्तिप्रदर्शन केलं आहे. त्यांच्या प्रचारसभेला शिंदे गटाकडून मंत्री दीपक केसरकर यांनी हजेरी लावली आहे. तर दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही मुरजी पटेलांच्या प्रचारसभेत दाखल झाले आहेत. अंधेरीच्या निवडणुकीत आमचाच विजय होईल, आम्ही ५१ टक्के मतं मिळवू, असा दावा यावेळी बावनकुळेंनी केला आहे.

IPL_Entry_Point