मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kannad Aurangabad : एटीएम फोडलं औरंगाबादेत अन् सायरन वाजलं मुंबईत; पोलिसांकडून एका आरोपीला अटक

Kannad Aurangabad : एटीएम फोडलं औरंगाबादेत अन् सायरन वाजलं मुंबईत; पोलिसांकडून एका आरोपीला अटक

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 29, 2023 03:21 PM IST

Kannad Crime News : औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नडमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचं एटीएम फोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Kannad Aurangabad Crime News Marathi
Kannad Aurangabad Crime News Marathi (HT_PRINT)

Kannad Aurangabad Crime News Marathi : काही दिवसांपूर्वी औरंगाबाद शहरातील एटीएम फोडून लाखोंची रक्कम चोरट्यांनी पसार केल्याची घटना ताजी असतानाच आता जिल्ह्यातील कन्नड शहरात स्टेट बँक ऑफ इंडियाचं एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परंतु चोरट्यांनी एटीएम फोडल्यानंतर मुंबईतील एसबीआयच्या कार्यालयात सायरन वाजल्यामुळं बँकेच्या अधिकाऱ्यांनी कन्नड शहर पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी दाखल होत आरोपीला बेड्या ठोकल्या आहे. सलीम शब्बीर पठाण असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. मध्यरात्री एबीआयचं एटीएम फोडल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर आता कन्नड शहरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड शहरातल्या एका एटीएमवर चोरट्यानं हल्ला करत त्यातील रोख रक्कम लुटण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यावेळी घटनास्थळाशेजारी असलेल्या बँकेत सायरन न वाजता मुंबईतील एसबीआयच्या कार्यालयात सायरन वाजला. त्यानंतर मुंबईतील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी या तातडीनं या घटनेची माहिती कन्नड पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस निरीक्षक राजू तळेकर यांनी तातडीनं घटनास्थळी दाखल होत आरोपीला अटक केली आहे.

एटीएम चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याची चौकशी सुरू केली आहे. यापूर्वीदेखील कोणतंही एटीएम कार्ड नसताना आरोपीनं चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली होती. इतकंच नाही तर पिशोर नाका येथील एचडीएफसीचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केल्याचं आरोपीनं कबुल केलं आहे. त्यानंतर आता कन्नड पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

IPL_Entry_Point