मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Rape Case : अश्लिल व्हिडिओ दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार; संतापजनक घटनेमुळं यवतमाळ हादरलं

Rape Case : अश्लिल व्हिडिओ दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार; संतापजनक घटनेमुळं यवतमाळ हादरलं

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Feb 19, 2023 05:38 PM IST

Yavatmal Rape Case : आरोपीनं पाचवीत शिकणाऱ्या मुलीला अश्लिल व्हिडिओ दाखवून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Rape Case In Waghapur Yavatmal
Rape Case In Waghapur Yavatmal (HT_PRINT)

Rape Case In Waghapur Yavatmal : पाचवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला आरोपीनं अश्लिल व्हिडिओ दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वाघापूरमध्ये ही संतापजनक घटना घडली असून एका शाळेतील बाललैंगिक शिक्षणासंदर्भात चाईल्ड लाईनतर्फे घेण्यात आलेल्या कार्यशाळेवेळी या घटनेचा खुलासा झाला आहे. त्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपीवर गुन्हा दाखल करत त्याच्या अटकेची कार्यवाही सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वीच यवतमाळ जिल्ह्यात एका तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता पुन्हा एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्यातील वाघापूर परिसरातील एका शाळेत पाचवीत शिकणाऱ्या मुलीला खुशाल चावरे या आरोपीनं अश्लिल व्हिडिओ दाखवत बलात्कार केला, त्यानंतर या घटनेबाबतची माहिती कुणाला दिल्यास आरोपीनं पीडितेला जीवे मारण्याची धमकीही दिली. त्यामुळं घाबरलेल्या मुलीनं या घटनेची कुठेही वाच्यता केली नाही. परंतु पीडितेच्या शाळेत लैंगिक शिक्षणाबद्दल एका कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी समुपदेशकांनी विद्यार्थीनींना कुणी अत्याचार करत असेल तर त्याची तक्रार करण्याचं आवाहन केलं.

त्यावेळी पीडित मुलीनं तिच्यासोबत घडलेला सारा प्रकार शिक्षकांसह समुपदेशकांना सांगितला. त्यानंतर एकच वाघापुरमध्ये एकच खळबळ उडाली. पीडित मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपी खुशाल चावरे याच्याविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय पोलिसांनी आरोपीच्या अटकेची कार्यवाही सुरू केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

WhatsApp channel