मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sandeep Deshpande : संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्यामागे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत; मनसेचा आरोप

Sandeep Deshpande : संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्यामागे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत; मनसेचा आरोप

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Mar 03, 2023 12:57 PM IST

Sandeep Deshpande : मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्यामागे आदित्य ठाकरे व संजय राऊत यांचा हात असल्याचा आरोप मनसेनं केला आहे.

Sanjay Raut - Aaditya Thackeray - Sandeep Deshpande
Sanjay Raut - Aaditya Thackeray - Sandeep Deshpande

Sandeep Deshpande महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांच्यावर आज सकाळी झालेल्या हल्ल्यानंतर मनसे आक्रमक झाली आहे. देशपांडे यांच्यावरील हल्ल्यामागे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे व संजय राऊत यांचा हात असल्याचा आरोप मनसेनं केला आहे. पोलिसांनी या दोघांचीही चौकशी करावी अशी मागणी मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी केली आहे.

संदीप देशपांडे यांच्या हाताला फ्रॅक्चर झालं आहे. त्यांच्यावर उपचार करून त्यांना सोडून देण्यात आलं आहे. तत्पूर्वी, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, अमित ठाकरे, नितीन सरदेसाई यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची विचारपूस केली.

संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्यात संजय राऊत व आदित्य ठाकरे यांचा हात असल्याचा थेट आरोप अमेय खोपकर यांनी केला आहे. ‘देशपांडे यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा खोपकर यांनी निषेध केला आहे. संजय राऊत व आदित्य ठाकरे हे चिंधीचोर गुंड आहेत. ते पाठीमागून हल्ले करत आहेत. संजय राऊत रोज सकाळी टीव्हीवर मर्दानगीची भाषा करतात. हिंमत असेल तर त्यांनी समोरून हल्ले करावेत. पाठीमागून कसले हल्ले करता?,' असा संताप खोपकर यांनी केला आहे.

आदित्य ठाकरे व संजय राऊत यांची चौकशी करावी. त्यातून काही आढळलं तर त्यांना अटक करावी, असं आवाहन खोपकर यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना केलं आहे.

संदीप देशपांडे गप्प बसणार नाही!

संदीप देशपांडे हे मुंबई महापालिकेत शिवसेनेनं केलेले भ्रष्टाचार बाहेर काढत आहेत. त्यामुळंच त्यांना लक्ष्य केलं जात आहे. पण मी संदीपला चांगलं ओळखतो. तो अशा हल्ल्यांमुळं गप्प बसणार नाही. तो भ्रष्टाचार बाहेर काढतच राहील. प्रशासनानं व मुंबई पोलिसांनी संदीपला पुरेशी सुरक्षा द्यावी, अशी मागणी अमेय खोपकर यांनी केली आहे.

 

IPL_Entry_Point

विभाग