मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Shirur murder: काम सोडून घरकाम करावे लागणार असल्याने दिराने केला भावजयीचा खून, पळून जाताना अपघातात दीराचा मृत्यू

Pune Shirur murder: काम सोडून घरकाम करावे लागणार असल्याने दिराने केला भावजयीचा खून, पळून जाताना अपघातात दीराचा मृत्यू

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 26, 2023 09:48 AM IST

Pune Shirur murder: पुण्यातील असलेले काम सोडून गावाकडे शेती, जनावरे आणि घर सांभाळावे लागणार असल्याने एका दिराने भावजयीवर प्राणघातक हल्ला करून तिचा खून केला. पळून जात असतांना अपघातात दिराचाही मृत्यू झाला.

प्रियांका सुनील बेंद्रे
प्रियांका सुनील बेंद्रे

पुणे : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील काम सोडून गावी शेती, जनावरे आणि घर सांभाळण्यासाठी जावे लागणार असल्याच्या रागातून सावत्र भावाने भावजय आणि भावावर प्राणघातक हल्ला केला. भावजयवर चाकू हल्ला करत तिच्या डोक्यात लोखंडी डंबेल्स मारल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत भाऊ हा गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, खून करून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेला आरोपी दिराचा देखील एका वाहनाला धडकुन मृत्यू झाला. ही घटना शिरूर तालुक्यातील आंबळे येथे मंगळवारी पहाटे चार ते पाचच्या सुमारास घडली.

Maharashtra weather : राज्यात पुढील ४८ तासांत गारपीटीची शक्यता; 'या' जिल्ह्यांना बसणार तडाखा, ऑरेज अलर्ट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल बाळासाहेब बेंद्रे (वय २५) असे मृत झालेल्या हल्लेखोर दिराचे नाव आहे. या घटनेत प्रियांका सुनील बेंद्रे (वय २८) या ठार झाल्या आहेत. तर आरोपीचा भाऊ आणि मृत प्रियंकाचा नवरा सुनील बाळासाहेब बेंद्रे (वय ३०) हा गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. मृत प्रियंका आणि जखमी सुनील हे दोघेही आयटी इंजिनियर आहेत. या प्रकरणी बाळासाहेब पोपट बेंद्रे यांनी शिरूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Mumbai Traffic Police : वाढत्या उष्माघातामुळे मुंबई पोलिस अलर्ट; कर्मचाऱ्यांसाठी काढला ‘हा’ महत्वाचा आदेश

मृत आरोपी अनिल बेंद्रे आणि जखमी सुनील बेंद्रे हे सावत्र भाऊ आहेत. हे दोघेही पुण्यात नोकरीस होते. दोघेही पुण्यातच राहण्यास होते. आरोपी अनिल हा एका खासगी कंपनीत कमाला होता. तर सुनीलहा एका आयटी कंपनीत नोकरी करत होता. सुनीलला दारूचे व्यसन होते. यामुळे त्याचे काम टिकत नव्हते. यामुळे त्याला सुधारवण्याच्या हेतूने त्याला गावाकडे आणून शेती करायला किंवा गाई सांभाळण्याच्या व्यवसाय सुरू करून द्यावा, असे सुनीलने अनिलला सांगितले. दरम्यान, फिर्यादी बाळासाहेब बेंद्रे यांनी अनिलला १५ एप्रिल रोजी गावी आंबळे येथे आणले.

Astro Tips : झटक्यात होईल प्रमोशन, उत्पन्नात होईल वाढ, करा हे सोपे उपाय

अनिलला शेती आणि जनावरे सांभाळायची नव्हती. यामुळे तो पुन्हा पुण्यात जण्यासाठी हट्ट करत होता. त्याने वडिलांना पुण्यात जाण्यासाठी पैसे देखील मागितले होते. ते त्याला न दिल्याने त्याने भांडण उकरून काढले. दरम्यान, सावत्र भाऊ सुनील याच्या सांगण्यावरूनच वडिलांनी आपल्याला गावी आणल्याचा राग त्याच्या असल्याने त्याने रविवारी (दि २३) रागाच्या भरात घराचे दरवाजे, खिडक्या बंद करून घरातील सर्व वस्तू टेबल, खूर्च्यांची मोडतोड केली. मात्र, कुटुंबीयांनी समजून सांगितल्यानंतर तो शांत झाला.

मात्र, त्याच्या मनात राग कायम होता. सोमवारी रात्री सर्व एकत्र जेवण करून झोपी गेले. सुनील आणि प्रियांकासह हे टेरेसवर झोपायला गेले; तर अनिल खालच्या खोलीत झोपला. मात्र पहाटेच्या सुमारास अनिलने चाकू आणि लोखंडी डंबेल्सने सुनील आणि प्रियंकायांच्या डोक्यात वार केले. त्यांच्या ओरडण्याने बाळासाहेब हे आई व पत्नीसह टेरेसवर गेले तेव्हा ते हादरले. मुलगा आणि सून रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. आरोपीने त्यांच्यावर देखील हल्ला केला. यानंतर आरोपी अनिल हा दुचाकीवरून पळून गेला. दुचाकीवरून न्हावरेच्या दिशेने जात असताना आंबळेपासून जवळच अनिल बेंद्रे याच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या मोटारीने धडक झाली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारार्थ ससून रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

IPL_Entry_Point

विभाग