मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra weather : राज्यात पुढील ४८ तासांत गारपीटीची शक्यता; 'या' जिल्ह्यांना बसणार तडाखा, ऑरेज अलर्ट

Maharashtra weather : राज्यात पुढील ४८ तासांत गारपीटीची शक्यता; 'या' जिल्ह्यांना बसणार तडाखा, ऑरेज अलर्ट

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 26, 2023 06:57 AM IST

Maharashtra weather update : राज्यात अवकाळी पावसाने अजूनही विश्रांती घेतेली दिसत नाही. पुढील ४८ तासांत राज्याच्या अनेक भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. काही जिल्ह्यात गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Vidarbha And Marathwada Rain Update
Vidarbha And Marathwada Rain Update (HT)

पुणे आणि आसपासच्या परिसरात २५ तारीख ते २९ तारीख पर्यंत आकाश मुख्यत निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे व मेघगर्जना, वीजांचा कडकडाट हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच ३० आणि १ तारखेला आकाश निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश ढगाळ राहणार असून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

IPL_Entry_Point