मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Saamana: '४० गद्दारांना गाडून...' राऊतांनी शिंदे गटाला डिवचलं, ‘सामना’तील जाहिरात व्हायरल

Saamana: '४० गद्दारांना गाडून...' राऊतांनी शिंदे गटाला डिवचलं, ‘सामना’तील जाहिरात व्हायरल

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 22, 2023 10:09 AM IST

Balasaheb Thackeray's Birth Anniversary: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त संजय राऊत आणि विनायक राऊत यांनी शिवसेनेचा मुखपत्र सामनामध्ये जाहिरात देऊन शिंदे गटाला डिवचलं आहे.

Saamana advertisement
Saamana advertisement

Saamana Advertisement: सोमवारी म्हणजे २३ जानेवारीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. त्याच्या पूर्वसंध्येला शिवसेनेचा मुखपत्र सामनाच्या पहिल्या पानावर एक भलीमोठी जाहिरात छापून आली आहे. संजय राऊत आणि सुनील राऊत यांनी ही जाहिरात दिली आहे. या जाहिरातीमध्ये शिंदे गटातील आमदारांना गद्दार म्हणत त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

साहेब मी गद्दार नाही! गेलेल्या ४० गद्दारांना गाडून पुन्हा त्याच उमेदीने उभे राहू तेव्हाच तुम्हाला खऱ्या अर्थाने अभिवादन केले याचे समाधान आमच्यासारख्या शिवसैनिकांना मिळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र..., असा मजकूर या जाहिरातीमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता शिंदे गटाचे नेते या टीकेला प्रत्युत्तर देताना आक्रमक होण्याची शक्यता आहे.

शिवसेना पक्ष तसेच धनुष्यबाण हे पक्षाचे निवडणूक चिन्ह नेमके कोणाचे या मुद्द्यावरून शिंदे आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात सध्या कायदेशीर लढाई सुरू आहे. याबाबत सध्या निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. शिवसेना पक्ष तसेच धनुष्याबाण या निवडणूक चिन्हावर शिंदे गट आणि ठाकरे गट अशा दोघांनीही मालकी सांगितली आहे. याबाबत दोन्ही पक्षांनी निवडणूक आयोगासमोर आपला युक्तीवाद मांडला आहे. याबाबतचा युक्तीवाद पूर्ण झाला असून आयोगाने थेट निकाल न देता ३० जानेवारी ही पुढील तारीख दिली आहे.

शिवसेनेच्या पक्षप्रमुख पदावर कोण बसणार?

उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्षप्रमुखपदाचा कार्यकाल उद्या म्हणजेच २३ जानेवारी २०२३ ला संपणार आहे. ठाकरेंचा कार्यकाल संपल्यानंतर शिवसेनेच्या पक्षप्रमुख या पदावर कोण बसणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिवसेनेच्या पक्षघटनेमध्ये पक्षप्रमुखांची नियुक्ती नेमकी कोण करणार? याविषयी निश्चित अशी नियमावली नमूद करण्यात आली आहे. त्यानुसार, शिवसेनाप्रमुख हे पक्षाचे अध्यक्ष असतील. त्यांची निवड ही पक्षाच्या प्रतिनिधी सभेकडून केली जाईल. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमधील निवडक सदस्य प्रतिनिधी सभेवर असतात. पक्ष प्रमुखांची निवड पाच वर्षांसाठी केली जाते.

IPL_Entry_Point