मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Glowing Skin: ग्लिसरीनमध्ये मिक्स करा हे तेल, हिवाळ्यात निर्जिव त्वचाही मिनिटांत चमकेल

Glowing Skin: ग्लिसरीनमध्ये मिक्स करा हे तेल, हिवाळ्यात निर्जिव त्वचाही मिनिटांत चमकेल

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 17, 2023 11:08 AM IST

Glycerin in Winter: थंडीच्या दिवसात चेहऱ्यासोबत शरीरही डल दिसते. हवामानात ओलावा नसल्यामुळे हे घडते. तुमची त्वचा चमकदार होण्यासाठी तुम्ही ग्लिसरीनचा वापर करु शकता. ते कसे लावावे, जाणून घ्या.

हिवाळ्यात ग्लोइंग स्किनसाठी ग्लिसरीनचा वापर
हिवाळ्यात ग्लोइंग स्किनसाठी ग्लिसरीनचा वापर

Coconut Oil and Glycerin in Winter: हिवाळा येताच ओठ कोरडे व्हायला लागतात. यासोबतच नाक आणि गालही कोरडे होतात आणि खवलेयुक्त त्वचा बाहेर येऊ लागते. चेहऱ्यासोबतच शरीराचीही अशीच स्थिती होते. अशा परिस्थितीत अशा निर्जीव दिसणार्‍या त्वचेपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही खोबरेल तेल आणि ग्लिसरीन वापरू शकता. हे एक उत्तम ऑइल ट्रीटमेंट आहे, जे सहजपणे कोरड्या त्वचेपासून मुक्त होऊ शकते.

ट्रेंडिंग न्यूज

हे बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे -

- नारळ तेल

- ग्लिसरीन

- व्हिटॅमिन ई कॅप्सूल

- लिंबाचा रस (पर्यायी)

 

कसा बनवायचा आणि लावायचा

- ते बनवण्यासाठी प्रथम एका पॅनमध्ये पाणी गरम करा.

- नंतर मध्यभागी एक वाटी ठेवा आणि नंतर त्यात ग्लिसरीन, खोबरेल तेल आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल घाला.

- जर तुमची त्वचा आधीच ऑइली असेल तर त्यात लिंबाचा रस घाला, अन्यथा तुमची त्वचा कोरडी देखील होऊ शकते.

- आता सर्व गोष्टी नीट मिक्स करा आणि मग वाटी पाण्यातून बाहेर काढा.

- हा ऑइली पॅक तुमच्या स्वच्छ हातांवर आणि नंतर चेहऱ्याला लावा. शरीराचे जे काही भाग जास्त कोरडे वाटत असतील, तिथे तुम्ही हे लावू शकता.

 

कधी लावावे

हा ऑइली पॅक लावल्यानंतर तेलामुळे त्वचा चिकट वाटू शकते. म्हणूनच तुम्ही आंघोळीच्या काही तास आधी ते लावू शकता. किंवा हवे असल्यास रात्री अंगावर व चेहऱ्यावर लावा आणि झोपा. नंतर दुसऱ्या दिवशी आंघोळ करा. हे लावल्यानंतर तुम्हाला कोरड्या त्वचेची समस्या होणार नाही.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग