मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  स्वेटर घालून झोपताय? सावधान! आरोग्याला होऊ शकतात 'हे' नुकसान

स्वेटर घालून झोपताय? सावधान! आरोग्याला होऊ शकतात 'हे' नुकसान

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 16, 2023 10:31 PM IST

Winter Health Care Tips: वाढत्या थंडीत अनेक लोक रात्री स्वेटर घालून झोपतात. पण हे तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकते. कसे ते जाणून घ्या.

स्वेटर घालून झोपण्याचे साइड इफेक्ट
स्वेटर घालून झोपण्याचे साइड इफेक्ट

Health Risks of Wearing Sweater while Sleeping: जर तुम्ही देखील अशा लोकांमध्ये असाल जे रात्री थंडीपासून बचाव करण्यासाठी लोकरीचे कपडे घालून झोपतात, तर लगेच तुमची सवय बदला. हिवाळ्यात थंडीपासून वाचण्यासाठी प्रत्येक व्यक्ती उबदार कपडे घालते. पण रात्रीच्या वेळीही शरीर उबदार ठेवण्यासाठी, झोपतानाही लोकरीचे कपडे घातल्याने नुकसान होऊ शकते. असे केल्याने, नक्कीच तुम्हाला लगेच उबदार वाटेल आणि तुम्हाला आरामदायी आणि उबदार झोपही मिळेल. पण तुम्हाला माहित आहे का की स्वेटर किंवा लोकरीचे कपडे घालून झोपल्याने तुमच्या शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.

ट्रेंडिंग न्यूज

स्वेटर घालून झोपण्याचे साईड इफेक्ट

स्किन एलर्जी

स्वेटर घालून झोपल्याने त्वचा जास्त कोरडी होते. त्यामुळे त्वचेशी संबंधित अनेक प्रकारचे इन्फेक्शन सुरू होते. स्वेटर घालून झोपल्याने एक्जिमाची समस्या उद्भवू शकते. एक्जिमामुळे त्वचेवर कोरडेपणा आणि खाज येण्याची समस्या होते. ही समस्या टाळण्यासाठी स्वेटर घालून झोपू नका आणि जर तुम्ही झोपत असाल तर मॉइश्चरायझर लावायला विसरू नका.

थंडी सहन करण्याच्या क्षमतेवर परिणाम

जाड आणि लोकरीचे कपडे जास्त काळ परिधान केल्याने शरीराची थंडी सहन करण्याची क्षमता कमी होते. अशा परिस्थितीत जर तुम्ही थोडे कमी उबदार कपडे घालून बाहेर गेलात तर तुम्हाला थंडी सहज जाणवू शकते.

पिंपल्सची समस्या

तुम्हाला हिवाळ्यात घाम येत नाही असे वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे. हिवाळ्यात तुम्हाला घाम फुटला तरी ते लक्षात येत नाही. यासोबतच आम्ही तुम्हाला हेही सांगतो की तुमच्या स्वेटर किंवा लोकरीच्या कपड्यांमध्ये घाम शोषण्याची क्षमता चांगली नसते. त्यामुळे घाम तुमच्या शरीरावरच राहतो. जेव्हा या घामामुळे स्वेटरमुळे शरीराचे तापमान गरम होते, तेव्हा ते वेगवेगळ्या प्रकारचे पिंपल्स तयार करतात, ज्याला स्वेट पिंपल्स म्हणतात. या पिंपल्सनंतरही तुम्ही सतत स्वेटर घालत राहिल्यास हे पिंपल्स लवकर बरे होत नाहीत.

रिप्रोडक्टिव्ह हेल्थवर परिणाम

उबदार कपडे घालून झोपल्याने प्रजनन आरोग्याला हानी पोहोचते. रात्री झोपताना शरीरात जास्त प्रमाणात उष्णता निर्माण होत असल्याने जननेंद्रियाच्या भागातही घाम येतो. ज्यामुळे केवळ प्रायव्हेट पार्ट्समध्ये जळजळ होत नाही तर विविध संक्रमण देखील होऊ शकतात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग