मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Personality Development: महेंद्रसिंग धोनी कॅप्टन कूल का आहे? जाणून घ्या यशाचा मंत्र

Personality Development: महेंद्रसिंग धोनी कॅप्टन कूल का आहे? जाणून घ्या यशाचा मंत्र

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Apr 04, 2023 01:01 PM IST

MS Dhoni: महेंद्रसिंग धोनीचे व्यक्तिमत्त्व सर्वांनाच आवडते. मैदानावरही तो फारशी आक्रमकता दाखवत नाही. एमएस धोनीच्या या व्यक्तिमत्वामागचे सिक्रेट काय आहे जाणून घेऊया.

mahendra singh dhoni
mahendra singh dhoni (PTI Photo/R Senthil Kumar)

Captain Cool: महेंद्रसिंग धोनी एक असा खेळाडू ज्यावर फक्त भारतीयच नाही तर वेगेवगेळ्या देशातील लोकही फॅन आहेत. धोनी हा क्रिकेट जगतातील एक असा सूर्य आहे, जो कधीही मावळत नाही. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २००७ आणि २०११ चा विश्वचषक जिंकला होता. धोनीला मैदानावर कॅप्टन कूल म्हणूनही ओळखले जाते. याच कारण तर सगळ्यांनाच माहित आहे. धोनी मैदानावर फारच कुल अटीट्युडमध्ये असतो. महेंद्रसिंग धोनी प्रत्येक परिस्थितीत शांत कसा राहतो याचे सिक्रेट काय आहे हे जाणून घेयलाच हवं. एमएस धोनीच्या तल्लख व्यक्तिमत्वाचे सिक्रेट जाणून घेऊया.

ट्रेंडिंग न्यूज

कामावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक

आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणे हा धोनीचा यशाचा मंत्र आहे. तुमच्यासाठी, तुमचे काम पाहिलं असले पाहिजे. तो म्हणतो की त्याने क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले आणि बदल्यात क्रिकेटने त्याच्या इतर गोष्टींची काळजी घेतली.

सर्वोत्तम देण्यासाठी तयार

धोनीने मंदिरा बेदीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की तो देशासाठी खेळत असतो तेव्हा देशासाठी आपले सर्वोत्तम देण्यासाठी नेहमीच तयार असतो. धोनीचे मत आहे की, ज्या दिवसापासून तुम्ही तुमचे काम सुरू करता त्या दिवसापासून ते निवृत्तीपर्यंत तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांना काय देत आहात याचा विचार करणे गरजेचे आहे.

वर्तनमानात जगणे

२०२० मध्ये एका मुलाखतीदरम्यान महेंद्रसिंग धोनी म्हणाला होता की, भारतीय संघाचा कर्णधार तर फारच लांबच, पण त्याने कधी विचारही केला नव्हता की तो भारतासाठी खेळू शकेल. धोनीने स्वतः सांगितले की तो नेहमी वर्तमानात जगतो. उद्याचा विचार करू शकतो पण त्याचं लक्ष वर्तनमानातल्या गोष्टीवर असते. तो नेहमी गोष्टी साध्या ठेवण्याचा प्रयत्न करतो.

लोकांशी कनेक्शन

या मुलाखतीदरम्यान धोनीने स्वतः सांगितले होते की लोक त्याच्याशी पटकन कनेक्ट होतात. त्याने सांगितले की, जेव्हा लोक मला क्रिकेट खेळताना पाहतात तेव्हा ते असेही म्हणतात की धोनी आमच्यासारखा खेळतो.

WhatsApp channel