मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  आलियासाठी रणबीरने मागवले परदेशी गिफ्ट, लग्नानंतर जोडीदाराला द्या हे गिफ्ट

आलियासाठी रणबीरने मागवले परदेशी गिफ्ट, लग्नानंतर जोडीदाराला द्या हे गिफ्ट

Hiral Gawande HT Marathi
Apr 14, 2022 05:20 PM IST

रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू असताना आणखी एक गोष्ट समोर आली आहे. रणबीरने आलिया साठी खास परदेशातून गिफ्ट मागवले आहे. तुम्हाला सुद्धा तुमच्या पार्टनरला लग्नासाठी काही गिफ्ट द्यायचे असेल तर या आयडीया उपयोगी पडतील.

लग्नानंतर जोडीदाराला द्या खास गिफ्ट
लग्नानंतर जोडीदाराला द्या खास गिफ्ट

एकीकडे रणबीर कपूर आलिया भटच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले असताना तुम्ही सुद्धा तुमच्या लग्नाची स्वप्ने रंगवत असाल. रणबीरने आलियासाठी खास परदेशावरून कस्टम मेड वेडिंग बँड मागवले आहे. तुम्हाला सुद्धा तुमच्या पार्टनरला लग्नानंतर काही स्पेशल गिफ्ट द्यायचे आहे पण काय द्यावे हे सुचत नसेल तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, काही गिफ्ट आयडीया. आपल्या नवीन नात्याची सुरूवात तुम्ही पार्टनरला हे छानसे गिफ्ट देऊन करू शकता.

ट्रेंडिंग न्यूज

ज्वेलरीः पार्टनरला काही एक्सपेंसिव्ह आणि स्मरणात राहिल असे गिफ्ट द्यायचे असेल तर तुम्ही सोने किंवा चांदीची ज्वेलरी देऊ शकता. तुम्ही स्पेशल कपल ज्वेलरी देखील बनवून घेऊ शकता.

इलेक्ट्रॉनिक गॅजेटः जर तुम्ही वेडींग नाईटला पार्टनरला गिफ्ट द्यायचा विचार करत असाल तर तुम्ही इलेक्ट्रॉनिक गॅजेट देऊ शकतो. यात तुम्ही मोबाईल फोन, टॅबलेट किंवा तुमच्या पार्टनरला आवश्यक असलेले एखादे गॅजेट देऊ शकता.

बॅगः मुलगा असो वा मुलगी प्रत्येकच जण बॅगचे चाहते असतात. तुम्ही तुमच्या पार्टनरला ब्रँडेड बॅग गिफ्ट देऊ शकता. तुम्ही स्पेशल कस्टमाईज सुद्धा करून घेऊ शकता.

ब्युटी प्रोडक्टः जर तुम्हाला बायकोला खुश करायचे असेल तर ब्युटी प्रोडक्ट हे उत्तम ऑप्शन आहे. तुम्ही ब्रँडेड मेकअप प्रोडक्ट घेऊ शकता. नवऱ्याला गिफ्ट करायचे असेल तर तुम्ही सेल्फ केअर किट घेऊ शकता.

प्लांटः पर्यावरणाला सुंदर आणि सुखकारक बनवण्यासाठी रोपं महत्त्वाचे आहेत. घरातील हवा शुद्ध ठेवण्यासोबतच काही प्लांट प्रदूषण सुद्धा दूर करतात. तुमच्या नव्या नात्याची सुरूवात तुम्ही एखादे इन्डोअर प्लांट गिफ्ट देऊन करू शकता.

कपल बाथ रोब्सः मॅचिंग बाथ रोब एक बेस्ट ऑप्शन आहे, जे तुम्ही आंघोळीनंतर घालू शकता. तुम्ही हे स्पेशल कस्टमाईज सुद्धा करू शकता.

परफ्यूमः तुम्ही तुमच्या पार्टरला ब्रँडेड परफ्यूम गिफ्ट करू शकता. तुम्ही त्यांना त्यांच्या आवडीच्या ब्रँडचा परफ्यूम देऊ शकता. तसेच तुम्ही कपल सेट देखील घेऊ शकता.

WhatsApp channel