मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Skin Care: चेहर्‍याची चमक वाढवायची आहे? 'ही' गोष्ट लावा आठवडाभरात दिसेल रिझल्ट!

Skin Care: चेहर्‍याची चमक वाढवायची आहे? 'ही' गोष्ट लावा आठवडाभरात दिसेल रिझल्ट!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Mar 02, 2023 12:20 PM IST

Home Remedies: चेहऱ्याला ग्लोइंग बनवण्यासाठी काही देशी गोष्टी खूप प्रभावी ठरतात

skin care for glow
skin care for glow (freepik)

आताच्या काळात स्किन केअर फार महत्त्वाचं आहे. आपण आपल्या शरीराची काळजी तर घेतोच पण तशीच काळजी आपल्या त्वचेची घेणे खूप महत्त्वाची असते. अनेकांना चेहरा ग्लोइंग हवा असतो. पण अशावेळी त्यांना केमिकलयुक्त उत्पादनेही वापरायची नसतात. खरंतरं या स्वदेशी वस्तू बाजारातील महागड्या केमिकल प्रोडक्ट्सपेक्षा चांगल्या असतात, ज्यामुळे त्वचा सुधारण्यास मदत होते. जाणून घ्या कोणत्या आहेत या देशी वस्तू आणि त्या कशा वापरता येतील.

ट्रेंडिंग न्यूज

तूप

तूप केवळ जेवणाची चव वाढवत नाही तर त्याचा वापर त्वचा निरोगी आणि चमकदार बनवण्यासाठीही करता येतो. तूप त्वचा सुधारण्याचे काम करते. बोटांवर थोडं तूप घेऊन चेहऱ्यावर चोळा. काही वेळाने तुम्ही ते धुवू शकता. फाटलेले ओठ पुन्हा हायड्रेट करण्यासाठीही तूप लावता येते.

खोबरेल तेल

त्वचेची काळजी घेण्यासाठी खोबरेल तेलाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. हे तेल त्वचेला आर्द्रता देते आणि कोरड्या निर्जीव त्वचेला पुनरुज्जीवित करते. रात्री चेहऱ्यावर हे तेल लावून झोपा. जर तुमची त्वचा जास्त तेलकट असेल तर थेट चेहऱ्यावर खोबरेल तेल लावणे टाळा.

बेसन

घरगुती उपायांबद्दल बोलताना बेसनाचा उल्लेख होणार नाही असं होऊच शकत नाही. तुम्ही बेसनाचे उटणे बनवू शकता. एका भांड्यात २ चमचे बेसन टाका आणि त्यात दोन चिमूटभर हळद, थोडे चंदन आणि गुलाबपाणी किंवा पाणी मिसळून पेस्ट तयार करा. ही तयार पेस्ट १५ मिनिटे चेहऱ्यावर ठेवल्यानंतर धुवा.

टोमॅटो

टोमॅटोमध्ये असे अनेक गुणधर्म आढळतात जे त्वचेची अशुद्धता दूर करण्यात प्रभावी ठरतात. एका भांड्यात टोमॅटोचा रस काढा आणि कापूस किंवा बोटांच्या मदतीने चेहऱ्यावर चोळा. काही वेळ ठेवल्यानंतर स्वच्छ धुवा. चेहऱ्यावरील घाण, मृत त्वचा आणि कोरडेपणा दूर करण्यासाठी टोमॅटोचा रस दर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी लावल्याने फायदा होतो.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग