Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. खालील जोक्स वाचा!
नवरा रात्री दोन वाजता दारू पिऊन घरी येतो. बायको दरवाजावर झाडू घेऊन उभी असते.
ती काही बोलायच्या आत तो सुरुवात करतो…
किती काम करशील? रात्रीचे दोन वाजलेत. अजून घर स्वच्छ करतेयस.
चल, तुला माझी शपथ. आता झाडू ठेवून दे आणि झोप बरं.
नवरा सध्या आयसीयूमध्ये उपचार घेतोय.
…
बायको - (रोमँटिंक मूडमध्ये) माझ्या मते लग्न म्हणजे एक लॉटरी आहे.
नवरा - (रागात) तुझं काहीही मत असेल. मला नाही तसं वाटत.
बायको - का?
नवरा - लॉटरीत दुसऱ्यांदा नशीब आजमवायची संधी मिळते.
…
आमच्या घरी सारखे पाहुणे यायचे…
मग पुण्याच्या मावशीनं मला इन्शुरन्स एजंट व्हायला सांगितलं.
तेव्हापासून चार वर्षे झाली,
आमच्याकडं कुणी फिरकलं नाही!
…
तुम्ही दिवसभर कितीही काम करा,
कोणाला दिसणार नाही.
पण तुम्ही पाच मिनिटं मोबाइल घेऊन बसा,
सगळ्यांना दिसणार!
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअॅप)