Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
काही लोकांना ऐकून घ्यायची सवयच लागलेली असते!
एकदा का बायकोनं सांगितलं की ५ मिनिटांत तयार होऊन येते,
तर मग
दर अर्ध्या तासाला विचारायची काय गरज आहे की आणखी किती वेळ लागेल?
…
आता लग्न करताना सात वचनांऐवजी आठ वचनं घेतली जाणार!
आठवं वचन असेल…
व्हॉट्सअॅप आणि फेसबुकपेक्षा जास्त वेळ मी माझ्या नवऱ्याकडं लक्ष देईन!
…
बायको जेव्हा तुम्हाला विचारते की,
काय बोललात?
तर त्याचा अर्थ असा नाही की तिनं काही ऐकलं नाही.
ती तुम्हाला तुमचं वाक्य बदलण्याची आणखी एक संधी देते, असा त्याचा अर्थ आहे.
बाकी तुम्ही समझदार आहात!
…
गर्लफ्रेंड घाबरत-घाबरत बॉयफ्रेंडला म्हणाली,
मी तुझ्यापासून एक गोष्ट लपवली.
मागच्याच महिन्यात माझा साखरपुडा झाला.
मला माफ कर.
बॉयफ्रेंड - अगं वेडी, एवढं मनाला लावून घेऊ नको.
आज माझ्या घरी चल. मी तुला माझ्या बायका-पोरांची ओळख करून देतो.
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअॅप)
संबंधित बातम्या