Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
पूर्वीच्या काळी दोघांचं भांडण झालं तर,
तिसरा माणूस येऊन सोडवायचा.
आता,
दोघांचं भांडण झालं तर,
तिसरा व्हिडिओ बनवतो!
…
गुरुजी - बंड्या, अकबराचा जन्म कधी झाला सांग बघू
बंड्या - शांतपणे उत्तर देतो.
हे बघा गुरुजी, मी इथं शिकायला येतो.
बाळंतपणाच्या नोंदी ठेवायला नाही!
…
बायको - अहो, मी काय म्हणते?
नवरा - बरोबर आहे तुझं.
बायको - अहो पण मी अजून काही बोललेच नाही.
नवरा - त्यानं काय फरक पडतो.
बोलली नाहीस तरी तुझंच बरोबर आहे.
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअॅप)
संबंधित बातम्या