Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. खालील जोक्स वाचा!
मुलगी - तुला नैराश्य आलं की तू काय करतो?
मुलगा - मी मंदिरात जातो.
मुलगी - अरे व्वा! तिथं ध्यानधारणा करतो का?
मुलगा - नाही, मंदिराबाहेरच्या लोकांच्या चपला मिक्स करतो.
मग त्यांची गंमत बघत बसतो.
…
योग्य शब्द कोणता? नर्क की नरक?
मी म्हणालो, तुम्हाला जाण्याशी कारण, शब्द काय करायचाय?
तर तो भडकला. यात भडकण्यासारखं काय आहे?
…
नवरा - माझ्या छातीत दुखायला लागलंय.
ताबडतोब अॅम्बुलन्स बोलव
बायको - लगेच बोलवते. तुमच्या मोबाइलचा पासवर्ड सांगा.
नवरा - नको राहू दे. थोडं बरं वाटतंय आता.
…
बंड्या एका वैदूकडं जातो.
बुवा, मला एक विचित्र आजार झालाय.
माझी बायको जे काही बोलते, ते मला ऐकायलाच येत नाही!
वैदू - काय म्हणता? हा आजार नाही. तुमच्यावर देवाची कृपा झालीय!
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअॅप)