Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. खालील जोक्स वाचा!
बायको - मी किती साधी होते नाही.
लग्नाच्या वेळी तुम्हाला न बघतात होकार दिला होता.
नवरा - म्हणजे, तू माझा फोटो सुद्धा बघितला नव्हता का?
बायको - नाही ओ. आई-बाबांनी सांगितलं आणि मी तयार झाले.
नवरा - मी तर तुझ्यापेक्षाही साधा होतो.
तुझा फोटो पाहूनही मी नकार दिला नाही…
…
बायकांनी त्यांची गुपितं फक्त नवऱ्यालाच सांगितली पाहिजेत…
ती कायम गुपितंच राहतात.
कारण,
जो ऐकतच नाही, तो दुसऱ्याला कुठून सांगणार?
…
बंड्या - (पिंट्याला) दारू ही जगातील सगळ्यात वाईट गोष्ट आहे.
बंड्याचं हे बोलणं ऐकून पिंट्याला बरं वाटलं.
त्याला वाटलं बंड्याला आपली चूक कळली, तो बहुतेक आता दारू बंद करणार.
पिंट्या - बरं झालं बंड्या. शेवटी तुला कळलं. आता लगेच दारू सोडून टाक.
बंड्या - छे छे… सोडून का?
पिंट्या - अरे तूच म्हटलास ना वाईट आहे म्हणून.
बंड्या - हो पण ती सोडायची म्हणून नाही म्हणालो.
अरे, काल रात्री दारूच्या नशेत मी 'आय लव्ह यू' म्हणालो, तेही बायकोला.
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअॅप)
संबंधित बातम्या