Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. खालील जोक्स वाचा!
सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना…
परीक्षेचा निकाल आला आहे, त्यामुळं
घरातील चप्पल, झाडू, बेल्ट
सर्व काही लपवून ठेवावं!
...
चिडून, भांडून माहेरी गेलेल्या बायकोला नवरा पुन्हा फोन करतो
सासू - तुम्हाला किती वेळा सांगितलं की ती आता तुमच्या घरी येणार नाही,
मग रोज का फोन करता?
जावई - ऐकायला खूप बरं वाटतं म्हणून…
...
बाई : बंड्या तू वर्गात सारखा मुलींशी गप्पा का मारत असतोस?
बंड्या - बाई मी गरीब घरचा आहे…
मला Whatsapp परवडत नाही
...
गुरुजी: लहानपण आणि मोठेपण यात काय फरक आहे?
पिंट्या - लहानपणी चिवडा, फरसाण, चकली याला ‘खाऊ’ बोलणारी मुलं,
मोठी झाल्यावर यालाच ‘चकना’ म्हणतात.
गुरुजींनी मारून मारून बंड्याचा 'चकना' केला!
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअॅप)