Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. खालील जोक्स वाचा!
गणिताचे शिक्षक स्टाफरूममध्ये रिकाम्या डब्यात चपाती बुडवून खात होते...
तेवढ्यात मराठीचे शिक्षक तिथं आले.
गणिताच्या शिक्षकांना बघून चकीत झाले.
म्हणाले, सर तुमच्या डब्यात तर भाजी दिसत नाही...
गणिताचे शिक्षक : मी भाजीला X मानलंय!
…
थत्ते : "मी इथले टॉयलेट वापरू शकतो का ?"
पत्की : "हो, पण पैसे पडतील...!"
थत्ते काका : "नाही पडणार.... बसताना काळजी घेईन...
…
बायकांची प्रार्थना…
हे देवा माझ्या नवऱ्याला धन, दौलत, यश समृद्धी सगळं काही दे
माझ्यासाठी काही नको.
:
:
त्याच्याकडून कसं काढायचं ते मी बघते...
…
संता आणि बंता हॉटेलमध्ये सामोसा खात असतात.
संता - सामोस्याचा वरचा भाग काढून आतली भाजी खात असतो.
बंता विचारतो, ओय संत्या तू फक्त भाजी खातोयस!
संता - हो. माझ्या आईनं सांगितलंय बाहेरचं काही खात जाऊ नकोस!
संताचा आज्ञाधारकपणा पाहून बंता भारावून गेला!
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअॅप)