Lesser Known Places of Manali: शिमला आणि मनाली ही दोन्ही हिल स्टेशन्स आहेत जिथे बहुतेक लोक सुट्ट्यांमध्ये फिरायला जातात. देश-विदेशातील अनेक पर्यटक मनालीला भेट देतात.उन्हाळ्यात या हिल स्टेशनवर पर्यटकांची गर्दी असते. हिमाच्छादित शिखरे आणि पाइन वृक्षांनी वेढलेले मनाली पर्यटकांना खूप आवडते. तुम्ही सुद्धा उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर मनाली एक उत्तम डेस्टिनेशन आहे. मनालीमध्ये तुम्ही अनेक ठिकाणे एक्सप्लोर करू शकता. तथापि जर तुम्ही शांत आणि सुंदर अशी जागा शोधत असाल तर तुम्ही मनालीच्या आसपासची ठिकाणे एक्सप्लोर केली पाहिजेत. खूप कमी लोक या ठिकाणी फिरायला जातात. जाणून घ्या अशा ठिकाणांबद्दल जे फारशा लोकांनी एक्सप्लोर केले नाही
मनालीमध्ये अनेक मंदिरे आहेत. परंतु जुन्या मनालीतील मनू मंदिर हे एक खास मंदिर आहे. असे मानले जाते की ऋषी मनूला समर्पित हे जगातील एकमेव मंदिर आहे. हे मंदिर लाकडी वास्तुकला आणि शांत वातावरणासाठी ओळखले जाते.
मनालीपासून सुमारे ६० किलोमीटर अंतरावर स्थित, तीर्थन व्हॅली हे कमी ज्ञात ठिकाण आहे, जिथे तुम्हाला शांत वातावरण मिळते. स्वच्छ नदी, घनदाट जंगले, मासेमारी आणि ट्रेकिंग सारख्या अॅक्टिव्हिटीसाठी हे ओळखले जाते.
रोहतांग पासच्या वाटेवर वसलेले गुलाबा हे बर्फाच्छादित शिखरांचे अप्रतिम दृश्य असलेले सुंदर गाव आहे. हे रोहतांग पासपेक्षा कमी गर्दीचे आहे. निसर्ग प्रेमी आणि छायाचित्रकारांसाठी हे शांत ठिकाण आहे.
मनालीतील काही नवीन ठिकाणे एक्सप्लोर करायची असतील तर सेथन गावात जा. पर्यटकांच्या गर्दीपासून दूर, मनालीजवळील सेथन गाव हे एक लहान आणि शांत गाव आहे. स्थानिक जीवनशैली अनुभवण्यासाठी, निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आणि पॅराग्लायडिंगसारख्या अॅक्टिव्हिटीचा आनंद घेण्यासाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)