मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  मुलांना झाली मोबाईलची सवय? रागवू नका तर अशा प्रकारे सोडवा हे व्यसन

मुलांना झाली मोबाईलची सवय? रागवू नका तर अशा प्रकारे सोडवा हे व्यसन

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 23, 2023 10:59 PM IST

Parenting Tips: जर मूल दिवसभर मोबाईल मध्ये खेळत असेल आणि त्याला गेमिंगची सवय झाली असेल तर त्याला रागवू नका. मुलांचे मोबाईलचे व्यसन कमी करण्यासाठी या पद्धतींचा अवलंब करा.

मुलांचे मोबाईलचे व्यसन सोडवण्यासाठी टिप्स
मुलांचे मोबाईलचे व्यसन सोडवण्यासाठी टिप्स (unsplash)

Tips to Stop Mobile Addiction in Kids: आजकाल प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन असतो. त्याचबरोबर कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात लहान मुलांच्या हातात मोबाईल आला. ज्यावर त्यांचा ऑनलाइन क्लास चालवला जात होता. पण आता सर्व शाळा सुरू झाल्यानंतरही मुले मोबाईलचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होत आहे. दिवसभर मोबाईलवर वेळ घालवण्याच्या सवयीमुळे मुलाला त्रास होत असेल तर त्याला रागवू नका. तर या पद्धतींचा अवलंब करा. हळूहळू दिवसभर ही सवय आपोआप कमी होईल.

- मुलांचे संगोपन करताना लक्षात ठेवा की, मुले पालकांना पाहूनच शिकतात. त्यामुळे सर्वप्रथम स्वत:चा मोबाईल पाहण्याच्या सवयीवर नियंत्रण ठेवा.

- जर तुमच्या किशोरवयीन मुलाला मोबाईल गेमिंगची सवय लागली असेल तर लगेच त्याला रागवून मोबाईल हिसकावू नका. असे केल्याने त्याच्यावर वाईट परिणाम होईल. पण हळूहळू इतर कोणत्याही कामात त्याचे लक्ष डायवर्ट करून त्याचे गेमिंगचे व्यसन दूर होईल.

- जर मूल गरजेपेक्षा जास्त मोबाईल वापरत असेल तर त्याला झालेल्या नुकसानीबद्दल सांगा. मोबाइलच्या स्क्रीनवरून निघणाऱ्या निळ्या प्रकाशाच्या दुष्परिणामांमुळे त्याची त्वचा आणि डोळे खराब होतील. अशा गोष्टी समजावून सांगितल्यास मुलाला मोबाईलची सवय सुटण्यास मदत होईल.

- मुलाच्या हातातून मोबाईल हिसकावून आणि त्याला रागवून मोबाईलचे व्यसन कधीच दूर होऊ शकत नाही. तुमच्याकडे लहान मुले असल्यास, त्यांना बाहेर खेळण्यासाठी किंवा त्यांच्या आवडत्या अॅक्टिव्हिटीकडे आकर्षित करून मोबाईल सवयीपासून मुक्त करा.

- १० वर्षांपर्यंतच्या मुलांना मोबाइल देताना त्यात पॅरेंटल कंट्रोल अॅप ठेवा. जेणेकरुन मुलाला जे आवश्यक आहे तेच ते पाहू शकेल.

- जर मुलाचे वय १० वर्षांपेक्षा कमी असेल तर त्याचा मोबाईल पाहण्याची वेळ निश्चित करा. यामुळे मुलांच्या दिवसभर मोबाईल वापरण्याच्या सवयीवर नियंत्रण येईल आणि हळूहळू ही सवय सुध्दा निघून जाईल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग