मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  दुधाचे नाव ऐकताच मुले दूर पळतात? अशा प्रकारे बनवा टेस्टी

दुधाचे नाव ऐकताच मुले दूर पळतात? अशा प्रकारे बनवा टेस्टी

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 16, 2023 06:14 PM IST

दूध प्यायचे म्हटले की मुलं नाक तोंड एक करतात. दूध पिण्यासाठी पालकांना कितीतरी गोष्टी कराव्या लागतात. तुमची मुले सुद्धा दूध प्यायला कंटाळा करत असतील तर अशा प्रकारे दूध टेस्टी बनवा.

मुलांनी आवडीने दूध प्यावे यासाठी टिप्स
मुलांनी आवडीने दूध प्यावे यासाठी टिप्स (unsplash)

Tips To Make Milk More Fun For Children: दुधाचे आरोग्यदायी फायदे कोणापासून लपलेले नाहीत. दुधामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे, कॅल्शियम आणि फॅट यांसारखे अनेक आवश्यक पोषक घटक असतात. जे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी मदत करतात. असे असूनही, बहुतेक घरांमध्ये आई आपल्या मुलांबद्दल तक्रार करतात की मुले अनेकदा दूध पिणे टाळण्यासाठी कारणं शोधत असतात. त्यामुळे त्यांना आवश्यक पोषक द्रव्ये मिळत नाहीत. तुम्हालाही तुमच्या मुलाची हीच समस्या असेल तर तुमचा टेन्शन दूर करण्यासाठी आम्ही तुम्हाला अशा टिप्स सांगत आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही दूध आणखी चविष्ट बनवू शकता आणि तुमच्या मुलाच्या आवडत्या पेयाच्या यादीत त्याचा समावेश करू शकता. कसे ते जाणून घेऊया.

चॉकलेट मिल्क

मुलांना चॉकलेटची चव खूप आवडते. अशा परिस्थितीत दुधाला चॉकलेटची चव देण्यासाठी तुम्ही त्यात चॉकलेट टाकू शकता. असे केल्याने, दुधाची चव वाढेल आणि मूल ते पिण्यासाठी कारणं शोधणार नाही. हे करताना हे देखील लक्षात ठेवा की चॉकलेटमध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे ते दुधात घालताना त्याचे प्रमाण कमी ठेवा.

थंड दूध

जर तुमच्या मुलाला गरम दूध प्यायला आवडत नसेल, तर तुम्ही थंड दुधात त्याच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स किंवा फळे घालूनही सर्व्ह करू शकता. असे केल्याने दुधाची चवच नाही तर पौष्टिकताही वाढते.

वेलचीचे दूध

वेलची घातल्याने दुधाची चव तर वाढतेच, पण वेलचीमध्ये असलेले आवश्यक पोषक घटकही दुधात समाविष्ट होतात. तुम्हाला हवं असल्यास मुलांच्या आवडत्या ड्रायफ्रुट्ससोबत तुम्ही दुधात वेलची टाकू शकता.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग