मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Masala Idli: संध्याकाळच्या चहासोबत बनवा स्टफ मसाला इडली, नोट करा सोपी रेसिपी

Masala Idli: संध्याकाळच्या चहासोबत बनवा स्टफ मसाला इडली, नोट करा सोपी रेसिपी

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 18, 2023 05:12 PM IST

Tea Time Snacks: जर तुम्हाला चहासोबत काही हेल्दी नाश्ता करायचा असेल तर तुम्ही रव्यापासून बनवलेली स्टफ इडली खाऊ शकता. ते अगदी सहज बनवता येते. ते बनवण्याची सोपी रेसिपी येथे पहा.

स्टफ मसाला इडली
स्टफ मसाला इडली

Stuffed Masala Idli Recipe: संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी खावेसे वाटते. अनेकांना अशी सवय असते की ते काहीही खाल्ल्याशिवाय चहा पीत नाहीत. अशा परिस्थितीत ते बिस्किटे किंवा स्नॅक्स खातात. तुम्हाला सुद्धा चहासोबत काहीतरी हेल्दी खायचे असेल तर तुम्ही स्टफ इडली ट्राय करा. ही रेसिपी बनवायला सोपी आहे आणि खायला सुद्धा खूप टेस्टी आहे. चांगली गोष्ट अशी आहे की तुम्ही ते झटपट रव्यापासून बनवता येते. त्यामुळे हे लवकर पचते आणि जे स्पेशल डायट फॉलो करतात त्यांच्यासाठी देखील चांगले असतात. इथे जाणून घ्या स्टफ्ड मसाला इडली कशी बनवायची

ट्रेंडिंग न्यूज

स्टफ मसाला इडली बनवण्यासाठी साहित्य

इडली बनवण्यासाठी

- रवा

- दही

- बेकिंग सोडा

- तेल

स्टफिंगसाठी

- बटाटा

- कढीपत्ता

- मोहरी

- धणे

- मीठ

- मिरची पावडर

- चाट मसाला

- काळी मिरी पावडर

- आमचूर पावडर

- मोहरीचे तेल

कसे बनवावे

स्टफ्ड मसाला इडली बनवण्यासाठी प्रथम बटाट्याचा मसाला तयार करा. ते बनवण्यासाठी तुम्ही प्रथम बटाटे उकळून घ्या आणि नंतर बटाटे सोलून मॅश करा. आता कढईत तेल गरम करून त्यात मोहरी आणि कढीपत्ता टाका आणि फोडणी द्या. त्यात सर्व मसाले घालून नंतर बटाटे घाला. चांगले मॅश करा आणि नंतर कोथिंबीरीने गार्निश करा. तुमच्या स्टफिंगसाठी बटाट्याचा मसाला तयार आहे.

इडली बनवण्यासाठी सर्वप्रथम रवा घ्या आणि त्यात दही घाला. नीट मिक्स करुन बॅटर तयार करा. आता त्यात मीठ घाला. थोडे पीठ घेऊन त्यात खाण्याचा सोडा टाकून इडली बनवा. आता स्टफ इडली बनवण्यासाठी इडली स्टँड पाणी घालून गरम करा आणि नंतर तेलाने ग्रीस करा. आता थोडे पीठ घालून त्यात बटाट्याचे थोडेसे सारण टाका. आता ते इडलीच्या बॅटरने कव्हर करा. काही वेळाने चेक करा आणि शिजल्यानंतर काढून घ्या. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते कापून त्याला फ्राय सुद्धा करु शकता.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग