मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Holi Colors: हर्बल कलरच्या नावाने केमिकल रंग खरेदी करताय? कसे ओळखावे? जाणून घ्या

Holi Colors: हर्बल कलरच्या नावाने केमिकल रंग खरेदी करताय? कसे ओळखावे? जाणून घ्या

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 01, 2023 05:46 PM IST

होळीच्या दिवशी बाजारात हर्बल कलर भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. पाकिटावर लिहिलेले हर्बलचे स्टिकर पाहून तुम्ही हे रंग खरेदी करत असाल तर जाणून घ्या खरा आणि बनावट रंग कसा ओळखायचा.

हर्बल कलर
हर्बल कलर (unsplash)

Tips to Identify Original Herbal Colors for Holi: होळीचा सण रंगांशिवाय अपूर्ण आहे. पण आजकाल भेसळीच्या जगात शुद्ध काहीही मिळणे कठीण वाटते. रंगांच्या या उत्सवात रंगांचा व्यवसाय करणारेच या रंगाचा भंग करतात. रासायनिक रंग त्वचेला हानी पोहोचवू नयेत म्हणून हर्बल कलर बाजारात उपलब्ध आहेत. जे नैसर्गिक उत्पादनांमध्ये मिसळून तयार केले जातात. पाकिटावर लिहिलेले हर्बल हे नाव पाहून जर तुम्ही खरेदी करत असाल तर काळजी घ्या. आजकाल काही फायद्यासाठी बनावट रंगांच्या म्हणजेच हर्बल कलर्सच्या नावाने केमिकल असलेले कलर विकले जात आहेत, जे ओळखणे महत्वाचे आहे. खरा आणि नकली रंग ओळखायचा असेल तर या गोष्टी नक्की लक्षात ठेवा.

ट्रेंडिंग न्यूज

होळीच्या रंगांमध्ये होते ही भेसळ

होळीच्या दिवशी बाजारात अनेक प्रकारचे रंग उपलब्ध असतात. ज्यामध्ये गुलाल, पाण्यात विरघळणारे रंग आणि पेस्ट विकल्या जातात. या रंगांमध्ये रसायने मिसळली जातात. गुलालाला अतिरिक्त चमक देण्यासाठी अनेकदा वाळू, अभ्रक, स्टार्च, काचेची पावडर टाकली जाते. त्याच बरोबर अनेक रंग तयार करण्यासाठी चांदीसारख्या चमकदार रंगांमध्ये कॉपर सल्फेट, क्रोमियम आयोडाइड, अॅल्युमिनियम ब्रोमाइड यांसारखी रसायने मिसळली जातात.

जर तुम्ही हर्बल कलर खरेदी करत असाल तर या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा.

फिकट रंग

हर्बल रंग किंवा ऑर्गेनिक रंग अगदी फिकट असतात. यामध्ये तुम्हाला कोणताही विशेष रंग किंवा चमक दिसणार नाही. दुसरीकडे, भेसळ आणि रसायने मिसळलेले रंग पूर्णपणे चमकदार आणि चांगले गडद रंगाचे दिसतील. ज्यांना मनापासून लावावेसे वाटेल. पण हे रंग त्वचेसाठी धोकादायक असतात.

वॉटर टेस्ट

हर्बल कलर साधारण पाणी लावूनच काढता येतो. जर तुम्ही रंग किंवा गुलाल खरेदी करणार असाल तर हाताच्या छोट्या भागावर रंग किंवा गुलाल लावून पहा. काही वेळाने ते साध्या पाण्याने काढण्याचा प्रयत्न करा. जर ते सहज निघाले तर समजावे की ते हर्बल आहे. रासायनिक रंग कधीच पूर्णपणे स्वच्छ होत नाहीत आणि त्यांचा रंग त्वचेवर राहतो. हे पूर्णपणे भेसळयुक्त रंग असतात.

पॅकिंग आणि लेबल काळजीपूर्वक वाचा

तुम्ही जर हर्बल कलर खरेदी करत असाल, तर त्याच्या पॅकेजिंगकडे नीट लक्ष द्या. कारण अनेकदा हर्बल कलर वापरण्याची पद्धत पॅकेटवर लिहिलेली असते. त्याच वेळी, रंगात असलेले घटक देखील त्याच्या लेबलवर लिहिलेले असतात. पॅकिंगची तारीख आणि वापरण्याची तारीख लिहिली असते. पॅकेटमध्ये बनणाऱ्या साहित्यात कोणत्याही प्रकारचे रसायन लिहिलेले असेल जे हानिकारक असेल तर ते खरेदी करू नका.

काचेची भेसळ

गुलालमध्ये चमकणारे घटक मिसळले जातात. त्यात भेसळ असल्यास काचेचे बारीक तुकडे किंवा पावडर मिसळली आहे. ज्यामुळे त्वचा कापली जाते. गुलाल खरेदी करण्यापूर्वी हाताच्या तळव्यावर लावा आणि चोळा. त्वचेवर ते घासताना समजत समजत असेल तर ते गुलाल पाकिटे अजिबात विकत घेऊ नका.

स्वस्ताचा विचार करु नका

लहान मुलाला घरात रंग खेळण्याची मानसिकता असेल तर गुलाल खरेदी करताना खूप काळजी घ्यावी. बहुतेक हर्बल रंग महाग असतात. जर तुम्ही रंग खरेदी करण्यासाठी पैसे वाचवत असाल, तर हे शक्य आहे की तुम्ही बाजारातून केमिकल असलेले बनावट रंग घरी आणत आहात.

बनावट रंगाचे तोटे काय आहेत

बनावट रंग त्वचेवर लावल्याने त्वचा संवेदनशील बनते आणि त्यात एलर्जी होण्याची भीती असते. गुलालात सापडलेले काचेचे कण डोळ्यात जाण्याची भीती आहे. त्याच वेळी, या रंगाचा डोळे आणि फुफ्फुसांवर वाईट परिणाम होतो.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग