मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Makeup Trends 2023: येत्या वर्षात गुलाबी गाल ते चमकदार ओठांचा असेल ट्रेंड!

Makeup Trends 2023: येत्या वर्षात गुलाबी गाल ते चमकदार ओठांचा असेल ट्रेंड!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Dec 26, 2022 09:15 AM IST

Trend Forecasting in Fashion: २०२३ मध्ये मेकअपचे अनेक नवीन ट्रेंड्स पाहायला मिळतील.

मेकअप ट्रेंड
मेकअप ट्रेंड (Freepik)

Fashion Trends 2023: लवकरच २०२२ संपणार आहे, त्याचप्रमाणे प्रत्येकजण नवीन वर्षाची आतुरतेने वाट पाहत आहे. वर्ष बदललं की अनेक गोष्टी बदलतात. अशा स्थितीत मेकअप कसा पाठी राहील. २०२३ मध्ये मेकअपचे अनेक नवीन ट्रेंड्सही पाहायला मिळतील. जे तुम्ही सहज फॉलो करू शकता. चला तर मग जाणून घेऊया कोणता खास मेकअप लुक तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर लावायचा आहे.

ट्रेंडिंग न्यूज

स्टेटमेंट लिप्स

न्यूड शेड आणि मॅट लिप कलरचा ट्रेंड खूप दिवसांपासून सुरू आहे. पण नवीन वर्षात तुम्हाला स्टेटमेंटचा ट्रेंड ओठांवर पाहायला मिळेल. स्टेटमेंट लिप्स कलर ज्यामध्ये डार्क कलर लिप आउटिंगसह ओठांना आकार दिला जाईल. तसेच मॅट फिनिशऐवजी चकचकीत ओठांची निवड करा, ते यावर्षी ग्लॅमरस दिसेल.

मेटॅलिक आयशॅडो

डोळ्यांना विशेष आकार देण्यासाठी आय लाइनर ट्रेंडमध्ये राहील, मेटॅलिक कलरचा ट्रेंड आय शॅडो पॅलेटमध्ये दिसेल. जर तुम्हाला बोल्ड मेकअप फॉलो करायचा असेल तर खास मेटॅलिक कलर नाईट पार्टीसाठी ट्रेंडी लुक देईल.

रोझी चिक्स

फक्त ब्रांजर आणि हायलाइटर आता आउट ऑफ फॅशन होत आहे.. गाल लाल आणि गुलाबी करून सौंदर्य वाढवण्याचा ट्रेंड सुरू आहे. २०२३ मध्येही रोझी चिक्स हा ट्रेंड असेल. गालावर आणि नाकाच्या टोकावरील लाली या वर्षीही आवडतील पुढेही आवडेलच. त्यामुळे तुमचे सौंदर्य वाढवण्यासाठी गुलाबी, लाल आणि केशरी रंगाचे ब्लश वापरा.

डोळ्यांना द्या ड्रामेटिक लुक

मेटॅलिक आयशॅडोसह विंग्ड आयलायनरचा ट्रेंड डोळ्यांवर कायम राहील. फक्त पंख थोडा लांब आणि तीक्ष्ण असेल. त्यामुळे तुम्ही कॅट आय आणि विंग आयलायनरचे चाहते असाल तर यंदाही ते ट्रेंडमध्ये राहील. उच्च दर्जाचे शार्प ब्रश असलेले आय लाइनर बाजारात उपलब्ध होतील.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग