मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Travel: हे सुंदर ठिकाण पर्वतांची राणी म्हणून जाते ओळखले, आवर्जून द्या भेट!

Travel: हे सुंदर ठिकाण पर्वतांची राणी म्हणून जाते ओळखले, आवर्जून द्या भेट!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Dec 04, 2023 04:18 PM IST

Ooty: तुम्हाला डिसेंबरच्या सुट्टीत फिरायला जायचं असेल तर आम्ही एक खास ठिकाण सांगणार आहोत.

Traveling Tips
Traveling Tips (Freepik)

Travel and Tourism: डिसेंबर महिना सुरु झाला आहे. या महिन्यात ख्रिसमसची सुट्टी असते. या सुट्टीत अनेकांचे फिरायला जायचे प्लॅन होतात. तुम्ही प्लॅन करत असाल तर दक्षिण भारतात जा. दक्षिण भारतातील तामिळनाडूचे सौंदर्य पाहण्यासारखे आहे. रामेश्वरमपासून धनुषकोडीपर्यंत अशी अनेक ठिकाणे इथे पाहण्यासाठी आहेत. या जागा फक्त भारतीयांनाच आंही तर परदेशी लोकांनाही आवडतात. इथे एक खास जागा आहे. ज्याला पर्वतांची राणी म्हणतात. या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते. या ठिकाणाचे नाव आहे उटी. हे तामिळनाडूचे प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. इथे येताना लोक निलगिरीच्या डोंगरात हरवून जातात. येथील विस्तीर्ण चहाच्या बागा, तलाव, धबधबे आणि बागा पाहून लोक मंत्रमुग्ध होतात.

ट्रेंडिंग न्यूज

पायकारा धबधबा

पायकारा धबधबा हे उटीमधील सर्वात प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे. या धबधब्यांचे सौंदर्य पाहण्यासाठी इथे पर्यटकांची खूप गर्दी असते. मुकुर्तीच्या खडकातून उगम पावणारा पायकारा धबधबा तलावात पडतो आणि पायकारा तलावात विलीन होतो. हे दृश्य बघण्यासारखे असते.

टॉय ट्रेन

ऊटी हे ठिकाण ऍडव्हेंचर आणि रोमान्स या दोन्हीसाठी प्रसिद्ध आहे. अनेक कपल्सचं हे आवडीचं ठिकाण आहे. या ठिकाणचे हवामान अतिशय प्रसन्न झाले आहे. येथील ट्रॉय ट्रेनची राइड तुम्हाला फार आवडेल.

उटी तलाव

जर तुम्ही उटीला जाण्याचा विचार करत असाल तर येथे असलेल्या तलावाला भेट नक्की द्या. सुमारे ६५ एकर परिसरात पसरलेला हा तलाव बांधण्याचे श्रेय जॉन सुलिव्हन यांना जाते. हा तलाव १८२४ मध्ये बांधण्यात आला होता

उटीला कसे जायचे?

उटीला जाण्यासाठी विमान, ट्रेन आणि बस यासारख्या विविध सेवा उपलब्ध आहेत.पण, बहुतेक लोक रस्त्याने प्रवास करणे पसंत करतात कारण उटीचे सर्व रस्ते अतिशय निसर्गरम्य आहेत.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही.)

WhatsApp channel

विभाग