मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  No Smoking Day: धुम्रपान सोडवण्यासाठी मदत करतील या ७ सोप्या पद्धती

No Smoking Day: धुम्रपान सोडवण्यासाठी मदत करतील या ७ सोप्या पद्धती

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 08, 2023 10:59 AM IST

दरवर्षी मार्च महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी नो स्मोकिंग डे साजरा केला जातो. यानिमित्त धुम्रपान सोडवण्यासाठी सोप्या पद्धती जाणून घ्या.

धुम्रपान सोडवण्यासाठी सोप्या टिप्स
धुम्रपान सोडवण्यासाठी सोप्या टिप्स

Easy Steps to Quit Smoking: दरवर्षी भारतात मार्च महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी 'नो स्मोकिंग डे' साजरा केला जातो. यंदा हा दिवस ८ मार्च रोजी साजरा केला जात आहे. हा विशेष दिवस लोकांना धूम्रपानाच्या सवयीपासून दूर ठेवण्यासाठी आणि धूम्रपानामुळे आरोग्यास होणाऱ्या हानीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. धूम्रपानामुळे आरोग्याची अनेक प्रकारची हानी होते. ही सवय केवळ फुफ्फुसांच्याच नव्हे तर संपूर्ण आरोग्याच्या समस्येचे मूळ बनू शकते. अशा परिस्थितीत, जर तुम्हीही या व्यसनाचे बळी ठरला असाल तर जाणून घ्या, कोणत्याही साइड इफेक्टशिवाय या सोप्या टिप्स फॉलो करुन तुम्ही या व्यसनापासून मुक्त कसे होऊ शकता.

ट्रेंडिंग न्यूज

तज्ज्ञांच्या मते धूम्रपानाचे व्यसन तुमच्या आरोग्यावर परिणाम करते. सुरुवातीच्या टप्प्यात हे व्यसन सोडण्यासाठी तुम्ही शारीरिक हालचाली, इच्छाशक्ती, सकस आहार आणि चांगली संगत यांची मदत घेऊ शकता. पण जर तुम्हाला याचे व्यसन लागले असेल तर त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

या उपायांनी सोडवा धुम्रपानाचे व्यसन

योगासन

शारीरिक हालचालींद्वारे धूम्रपान करण्याची इच्छा कमी होते. तंदुरुस्तीवर लक्ष केंद्रित केल्याने धूम्रपानाची क्रेविंग कमी होऊ शकते. यासाठी तुम्ही भुजंगासन, सेतुबंधासन, सर्वांगासन, बालासन सोबत एरोबिक्स किंवा कार्डिओची मदत घेऊ शकता.

सोबती

जर तुम्हाला सिगारेटचे व्यसन सोडायचे असेल तर ते वातावरण आणि कंपनी टाळा, जिथे तुम्हाला पुन्हा सिगारेट ओढावीशी वाटते.

इच्छाशक्ती

जर तुम्हाला खरोखरच सिगारेटचे व्यसन सोडायचे असेल तर स्वत:साठी एक डेडलाइन निश्चित करा. त्यानंतरही धुम्रपान करण्याची इच्छा असल्यास दीर्घश्वास घ्या आणि पाणी प्या. असे केल्याने तुमचे लक्ष सिगारेटवरून विचलित होईल.

भविष्याचा विचार करा

जेव्हा तुम्ही सिगारेट ओढण्याचा विचार कराल तेव्हा तुमच्या करिअरवर, कुटुंबावर, मुलांवर किंवा तुमच्या आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांचा विचार करा. धुम्रपान सोडण्याचा तुमचा दृढनिश्चय बळकट करण्यात तुम्हाला मदत होईल.

लिंबू पाणी

सकाळी उठल्यावर २ ग्लास कोमट पाण्यात लिंबू पिळून त्यात मध टाकून प्यायल्याने सिगारेटचे व्यसन सुटू शकते.

बडीशेप

बडीशेप हा धूम्रपान सोडण्याचा सर्वात प्रभावी घरगुती उपाय आहे. जेव्हा तुम्हाला सिगारेट ओढावीशी वाटेल तेव्हा थोडी बडीशेप खा.

डॉक्टरांचा सल्ला

डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर निकोटीन रिप्लेसमेंट घेतल्यासही सिगारेटचे व्यसन सोडण्यास मदत होईल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel