मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Tomato Garlic Pasta: मुलांसाठी बनवा टेस्टी बनवा टोमॅटो गार्लिक पास्ता, रेस्टॉरंटसारखी चव देईल ही रेसिपी

Tomato Garlic Pasta: मुलांसाठी बनवा टेस्टी बनवा टोमॅटो गार्लिक पास्ता, रेस्टॉरंटसारखी चव देईल ही रेसिपी

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jun 21, 2023 06:52 PM IST

Recipe for Kids: पास्ता खायला सगळ्या मुलांना आवडते. तुम्ही सुद्धा मुलांसाठी पास्ता बनवायचा विचार करत असाल तर रेस्टॉरंट स्टाईल टोमॅटो गार्लिक पास्ताची ही रेसिपी ट्राय करा.

टोमॅटो गार्लिक पास्ता
टोमॅटो गार्लिक पास्ता (freepik)

Restaurant Style Tomato Garlic Pasta Recipe: मुलांना कधीही म्हटलं तरी ते पास्ता खायला तयार असतात. फक्त नाश्त्यातच नाही तर ते डिनरमध्ये सुद्धा पास्ता आवडीने खातात. पास्ता खायचं म्हटलं की मुलं खूश होतात. जर तुम्हाला मुलांसाठी घरी पास्ता बनवायचा असेल तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता. या रेसिपीमध्ये फक्त गव्हाच्या पिठापासून बनवलेला पास्ता वापरला नाही तर टोमॅटो आणि लसूण टाकल्याने रेसिपी हेल्दी आणि टेस्टी होईल. या रेसिपीमध्ये तुम्ही तुमच्या स्वतःच्या आवडीनुसार काही गोष्टी अॅड किंवा स्किप करू शकता. चला तर जाणून घेऊ कसे बनवायचे टोमॅटो गार्लिक पास्ता.

ट्रेंडिंग न्यूज

टोमॅटो गार्लिक पास्ता बनवण्यासाठी साहित्य

- ४०० ग्राम व्होल व्हीट पास्ता

- २ मोठे चमचे वर्जिन ऑलिव्ह ऑइल

- २ मूठ परमेसन चीज

- १ जुडी कोथिंबीर

- काळी मिरी पूड (आवश्यकतेनुसार)

- ५०० ग्रॅम चेरी टोमॅटो

- ८ तुळशीचे पानं

- मीठ

- पाणी

टोमॅटो गार्लिक पास्ता बनवण्याची पद्धत

पास्ता बनवण्यासाठी सर्वप्रथम व्होल व्हीट पास्ता उकळून घ्या. एक जाड बूडाची कढई घ्या आणि मध्यम आचेवर गरम करा. त्यात पाणी घालून उकळू द्या. यात थोडे मीठ टाका. पास्ता टाकून उकळू द्या. शिजल्यानंतर पाणी काढून टाका आणि पास्ता बाजूला ठेवा. चेरी टोमॅटो धुवून बारीक चिरून घ्या. लसूण देखील बारीक कापून घ्या आणि परमेसन चीज किसून घ्या. हे सर्व साहित्य वेगवेगळ्या बाऊलमध्ये ठेवा.

आता एक नॉन-स्टिक पॅन मध्यम आचेवर ठेवा आणि त्यात थोडे तेल गरम करा. पॅनमध्ये चिरलेला चेरी टोमॅटो घाला आणि ४ ते ५ मिनिटे शिजवा. टोमॅटो शिजल्यानंतर त्यात बारीक केलेला लसूण टाका आणि मिक्स करा. यासोबतच यात मीठ आणि काळी मिरी टाका. यानंतर यात कोथिंबीर टाकून सर्व नीट मिक्स करून घ्या. हे साधारण १० मिनीट शिजू द्या. टोमॅटो चांगले शिजून मॅश होईपर्यंत शिजवा. जर ते मिश्रण सुटू लागले तर त्यात थोडे पाणी टाका. आता शेवटी पहिलेच शिजवलेला पास्ता टाका आणि मिक्स करा. 

गॅसवरून पॅन खाली उतरवून घ्या. तुमचा टोमॅटो गार्लिक पास्ता रेडी आहे. प्लेट मध्ये काढा आणि वरून चीज टाकून गरमा गरम सर्व्ह करा.

WhatsApp channel

विभाग