मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  हाय बीपीच नाही तर लठ्ठपणाही कंट्रोल करतो आवळ्याचा चहा, जाणून घ्या फायदे आणि बनवण्याची योग्य पद्धत

हाय बीपीच नाही तर लठ्ठपणाही कंट्रोल करतो आवळ्याचा चहा, जाणून घ्या फायदे आणि बनवण्याची योग्य पद्धत

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 10, 2023 05:20 PM IST

Amla Tea: आवळ्यामध्ये लोह, व्हिटॅमिन-सी, पोटॅशियम, कॅल्शियम, मिनरल्स, फायबर, अँटी ऑक्सिडंट्स यासारखे फायदेशीर आवश्यक पोषक घटक असतात, जे एखाद्या व्यक्तीला अनेक प्रकारच्या आजारांपासून दूर राहण्यास मदत करतात. जाणून घ्या आवळ्याचा चहा कसा बनवावा.

आवळ्याचा चहा
आवळ्याचा चहा

Health Benefits of Amla Tea: लांब केसांपासून सुंदर त्वचेपर्यंत आवळा खाण्याचे फायदे तुम्ही अनेकदा ऐकले असतील. पण तुम्हाला माहित आहे का की आवळ्याच्या नियमित सेवनाने सुंदर केस आणि त्वचेचे स्वप्न तर पूर्ण होतेच, पण त्याचे दररोज सेवन केल्याने तुमच्या उच्च रक्तदाबापासून लठ्ठपणाची समस्याही दूर होऊ शकते. अतिलठ्ठपणामुळे थायरॉईड, शुगर, बीपी सारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. अशावेळी पोटॅशियमयुक्त आवळा शरीरातील सोडियमचे प्रमाण संतुलित ठेवण्यास मदत करतो. आवळ्यामध्ये लोह, व्हिटॅमिन-सी, पोटॅशियम, कॅल्शियम, मिनरल्स आणि फायबर, अँटीऑक्सिडंट्स यासारखे फायदेशीर आवश्यक पोषक घटक असतात, जे व्यक्तीला अनेक आजारांपासून दूर राहण्यास मदत करतात. आवळ्याचा चहा प्यायल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणाात राहतो, असे अनेक संशोधनातून समोर आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

आवळ्याचा चहा कसा बनवावा

आवळ्याचा चहा बनवण्यासाठी प्रथम २ कप पाणी चांगले उकळून त्यात आवळा पावडर, दालचिनी, आले, लवंग, काळी मिरी इत्यादी गोष्टी घाला. यानंतर चहा थोडा वेळ उकळू द्या. जेव्हा चहा चांगला उकळतो. नंतर चाळणीच्या साहाय्याने चहा गाळून घ्या. आता मध घालून चहाचा आस्वाद घ्या. आपण दररोज दोन कप आवळ्याचा चहा घेऊ शकता.

आवळ्याचा चहा पिण्याचे फायदे

ब्लड शुगर राहते नियंत्रणात

आवळ्यामध्ये असलेल्या अँटी डायबेटिक गुणधर्मांमुळे ते शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते. आवळ्याच्या चहाचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठीही फायदेशीर ठरू शकते.

वेट लॉस

आवळा पावडरमध्ये असलेले फायबर पचनसंस्था निरोगी ठेवते. यामुळे बद्धकोष्ठता आणि अपचन यांसारख्या पचनाच्या समस्या दूर होतात. आवळा चहाचे सेवन केल्याने भूक कमी होते. यासह, तुम्ही जास्त खाणे टाळता, जे वजन कमी करण्यास मदत करते.

बॉडी डिटॉक्स

आवळा पावडरमध्ये भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सिडंट असतात, जे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात. हे शरीर डिटॉक्स करते आणि वजन कमी करण्यास मदत करते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग