मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Rose Oil: सुरकुत्यांना ठेवायचंय लांब तर वापरा गुलाबाचे तेल, घरी बनवणे आहे सोपे

Rose Oil: सुरकुत्यांना ठेवायचंय लांब तर वापरा गुलाबाचे तेल, घरी बनवणे आहे सोपे

Hiral Shriram Gawande HT Marathi
Apr 16, 2023 05:48 PM IST

Rose Oil Benefits: गुलाब जलच नाही तर गुलाबाचे तेल सुद्धा त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. चाळीशी नंतर स्किन केअर रूटीनमध्ये या तेलाचा समावेश केल्याने सुरकुत्या येत नाहीत. गुलाबाचे तेल कसे बनवायचे आणि त्याचे फायदे जाणून घ्या.

गुलाबाचे तेल
गुलाबाचे तेल

How to Make Rose Oil at Home: स्किन केअर रूटीनमध्ये गुलाब जलचे एक विशेष स्थान आहे. त्वचा मुलायम बनवण्यासोबतच ते अनेक ब्लेमिश पासूनही मुक्त करते. गुलाब जल प्रमाणेच गुलाबाचे तेलही त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. हे लावल्याने त्वचा तरूण तर होतेच, पण त्वचा नैसर्गिकरित्या सॉफ्ट आणि ग्लोइंग सुद्धा होते. जर तुम्हाला बाजारातून गुलाबाचे तेल विकत घ्यायचे नसेल तर तुम्ही ते घरी सुद्धा बनवू शकता. गुलाबाचे तेल बनवण्याची ही पद्धत अगदी सोपी आहे. चला तर मग जाणून घेऊया गुलाबाचे तेल कसे बनवायचे.

ट्रेंडिंग न्यूज

गुलाबाचे तेल बनवण्याची पद्धत

जर तुम्हाला घरी गुलाबाचे तेल बनवायचे असेल तर तुम्हाला दोन ते तीन ताजे गुलाब लागेल. सोबत अर्धा कप ऑलिव्ह ऑईल घ्या. काचेच्या बॉटलमध्ये गुलाबाच्या पाकळ्या भरा. आता त्यात ऑलिव्ह ऑईल टाका आणि बॉटलचे झाकण बंद करा. एका खोलगट भांड्यात पाणी भरून गरम करा. जेव्हा पाणी गरम होऊ लागते, तेव्हा गरम पाण्यात गुलाबाच्या पाकळ्या आणि ऑलिव्ह ऑइलने भरलेले बॉटल ठेवा आणि सुमारे १५ मिनिटे राहू द्या. जेव्हा आतील तेल खूप गरम होईल आणि पाकळ्या त्यांचा सुगंध आणि रंग सोडतील तेव्हा गॅस बंद करा. ही बॉटल त्या गरम पाण्यात तोपर्यंत राहू द्या जोपर्यंत ते पाणी थंड होत नाही. तुमचे गुलाबाचे तेल तयार आहे. ते गाळणीने गाळून घ्या आणि तुमच्या स्किन केअर रूटीनमध्ये वापरा.

गुलाबाचे तेल त्वचेवर लावल्याने होणारे फायदे

अँटी एजिंग

वयाच्या चाळीशी नंतर त्वचेवर बारीक रेषा दिसू लागतात. या समस्यांवर गुलाब तेलाचा चांगला प्रभाव दिसून येतो. याचे दोन ते तीन थेंब रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा. त्यामुळे त्वचेमध्ये नवीन पेशी तयार होण्यास मदत होते. रोज डोळ्यांभोवती गुलाबाचे तेल लावल्याने दिसणार्‍या रेषा नाहीशा होऊ लागतात आणि त्वचा तरूण दिसते.

नैसर्गिकरीत्या मॉइश्चरायझ करते

रोज त्वचेवर गुलाबाचे तेल लावल्याने त्वचा नैसर्गिकरीत्या मॉइश्चरायइझ राहते आणि वेगळे मॉइश्चरायझर लावण्याची गरज नसते. यासोबतच त्वचा हायड्रेट राहते. ज्यामुळे कोरडेपणाची समस्याही दूर होते.

एक्ने आणि इंफ्लेमेशन पासून रक्षण करते

रोज त्वचेवर गुलाबाचे तेल लावल्याने टॅनिंग, एक्ने, पिंपल्स यासारख्या समस्यांपासून सुटका मिळते. त्यामुळे चेहऱ्यावरील इंफ्लेमेशनपासून आराम मिळते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग