मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Oily Skin Care: उन्हाळ्यात सोप्या पद्धतीने घ्या ऑइली स्किनची काळजी, होणार नाही पिंपल्स

Oily Skin Care: उन्हाळ्यात सोप्या पद्धतीने घ्या ऑइली स्किनची काळजी, होणार नाही पिंपल्स

Hiral Shriram Gawande HT Marathi
Apr 12, 2023 10:18 AM IST

Summer Skin Care Tips: उन्हाळ्यात त्वचा अधिक तेलकट होते. त्यामुळे त्वचेवर पिंपल्सची समस्या सुरू होते. येथे काही मार्ग आहेत, ज्याद्वारे तुम्ही त्वचेवरील अतिरिक्त तेल नियंत्रित करू शकता.

उन्हाळ्यात ऑइली स्किनची काळजी घेण्यासाठी टिप्स
उन्हाळ्यात ऑइली स्किनची काळजी घेण्यासाठी टिप्स (unsplash)

Tips to Maintain Oily Skin in Summer: उन्हाळ्यात त्वचेशी संबंधित सर्व समस्या सुरू होतात. कडक उन्हात, धूळ, आर्द्रता यात त्वचा खराब होते. अशा परिस्थितीत त्वचेला थोडी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. ऑइली स्किन असलेल्या लोकांना या ऋतूमध्ये खूप त्रास होतो. तेलकट त्वचा असणाऱ्यांनी या ऋतूत त्यांच्या त्वचेची योग्य निगा राखण्यासाठी स्किन केअर रुटीन बदलावे. असे केल्याने तेल उत्पादनावर नियंत्रण ठेवता येते.

ट्रेंडिंग न्यूज

उन्हाळ्यात ऑइली स्किनची काळजी कशी घ्यावी

लाइट मॉइश्चरायझर वापरा

काही लोकांना असे वाटते की ऑइली स्किनवर मॉइश्चरायझर वापरू नये. परंतु हे चुकीचे आहे. मॉइश्चरायझर त्वचेला हायड्रेट करते, सीबम उत्पादन नियंत्रित ठेवते. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही त्वचेवर हेवी मॉइश्चरायझर वापरू नये. तेलकट त्वचा असलेले लोक जेल बेस मॉइश्चरायझर वापरू शकतात.

सनस्क्रीन लावा

सूर्यापासून निघणारे अतिनील किरण त्वचेचे पूर्णपणे नुकसान करतात. अशा परिस्थितीत दररोज सकाळी चेहरा स्वच्छ केल्यानंतर त्वचेवर सनस्क्रीन लावा. तेलकट त्वचा असलेले लोक ऑइल फ्री किंवा जेल बेस सनस्क्रीन वापरू शकतात.

नैसर्गिक फेसपॅक लावा

त्वचेची काळजी घेण्यासाठी नैसर्गिक फेस पॅक वापरा. ऑइली स्किन असणाऱ्यांनी काकडी, चंदन, मुलतानी माती यासारखे फेस मास्क वापरावेत. चेहरा स्वच्छ करण्यासोबतच हे फेस पॅक त्वचेला थंड करतात आणि अतिरिक्त तेल शोषून घेतात.

टोनर वापरा

उन्हाळ्यात तेलकट त्वचा टाळण्यासाठी स्किन केअर रुटीनमध्ये टोनरचा नक्कीच समावेश करा. त्यात असलेले गुणधर्म त्वचेला शांत करतात आणि उघड्या छिद्रांना आकुंचित करतात. त्यामुळे अतिरिक्त तेलाचे उत्पादन नियंत्रणात राहते.

खाण्यापिण्याची काळजी घ्या

तेलकट त्वचा असलेल्या लोकांनी हेल्दी आणि हायड्रेटिंग पदार्थ खावेत. यासोबतच फास्ट फूड आणि तळलेले पदार्थ खाणे टाळावे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel