मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Dry Skin Care: उन्हाळ्यात त्वचेसाठी वरदान आहे दुधाची साय, अशा पद्धतीने लावा

Dry Skin Care: उन्हाळ्यात त्वचेसाठी वरदान आहे दुधाची साय, अशा पद्धतीने लावा

Hiral Shriram Gawande HT Marathi
Apr 15, 2023 01:59 PM IST

Summer Skin Care Tips: उन्हाळ्यात पाण्याच्या कमतरतेमुळे त्वचा खूप कोरडी होते. त्वचेच्या कोरडेपणा दूर करण्यासाठी तुम्ही चेहऱ्यावर दुधाची साय लावू शकता. कसे ते येथे पाहा.

उन्हाळ्यातील स्किन केअर टिप्स
उन्हाळ्यातील स्किन केअर टिप्स

Skin Care With Malai: उन्हाळ्यात त्वचा खूप निस्तेज आणि कोरडी होते. त्यामुळे चेहरा निर्जीव दिसू लागतो. कडक ऊन आणि पाण्याच्या कमतरतेमुळे सुद्धा त्वचा खूप कोरडी होते. या प्रकारच्या त्वचेला सामोरे जाण्यासाठी तुम्ही चेहऱ्यावर दुधाची साय किंवा मलई लावू शकता. कोरड्या त्वचेसाठी दुधाची साय खूप फायदेशीर आहे. चला तर जाणून घेऊया त्वचेवर दुधाची साय कशी लावायची.

ट्रेंडिंग न्यूज

साय मध्ये मिसळा वाइल्ड हळद

बहुतेक लोक स्किन केअरसाठी सुद्धा नॉर्मल हळद वापरतात. तसं तर याने फायदा होतो. तरी वाइल्ड किंवा जंगली हळद ही फक्त त्वचेसाठी असते. अशा वेळी दुधाच्या सायमध्ये जंगली हळद घालावी. हा पॅक सर्कुलर मोशनमध्ये मसाज करून चेहऱ्यावर लावा. नंतर काही वेळ चेहऱ्यावर ठेवून चेहरा स्वच्छ करा.

लिंबूसोबत मिक्स करा साय

त्वचेची चमक वाढवण्यासाठी तुम्ही दुधाच्या सायमध्ये लिंबू मिक्स करुन लावू शकता. या दोन्ही गोष्टी त्वचेला चांगल्या प्रकारे स्वच्छ करतात आणि क्रीम चेहऱ्याची चमक वाढवते आणि कोरडेपणा दूर करते. ते लावण्यासाठी सायमध्ये लिंबाचा रस घाला आणि नंतर काही वेळ चेहऱ्यावर लावा. यानंतर चेहरा सामान्य पाण्याने स्वच्छ करा.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel