मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Health Tips: फक्त वेट लॉसच नाही तर मधुमेहासाठीही फायदेशीर आहे काळे मीठ, मिळतात हे फायदे

Health Tips: फक्त वेट लॉसच नाही तर मधुमेहासाठीही फायदेशीर आहे काळे मीठ, मिळतात हे फायदे

Hiral Shriram Gawande HT Marathi
Apr 02, 2023 07:30 PM IST

सामान्यतः अन्नाची चव वाढवण्यासाठी वापरले जाणारे काळे मीठ आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. याच्या नियमित वापराने तुम्ही आरोग्याशी संबंधित अनेक समस्या टाळू शकता.

काळ्या मीठाचे आरोग्यासाठी फायदे
काळ्या मीठाचे आरोग्यासाठी फायदे (unsplash)

Health Benefits of Black Salt: कोशिंबीर असो वा रायता किंवा लिंबू सरबत या सर्व गोष्टींची चव काळ्या मिठाशिवाय अपूर्ण वाटते. काळे मीठ जेवणाची चव तर वाढवतेच पण नकळत तुम्हाला अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करते. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण तुमची वेट लॉस जर्नी पूर्ण करण्यातही तुम्हाला खूप मदत होऊ शकते. चला जाणून घेऊया काळे मीठ खाण्याचे आरोग्याला कोणते फायदे आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

काळे मीठ खाण्याचे आरोग्याला होणारे फायदे

बद्धकोष्ठता आणि पोट फुगणे या सारख्या समस्या दूर करण्यासाठी देखील खूप प्रभावी मानले जाते. काळ्या मिठात असलेले रेचक गुणधर्म पोटातील गॅस आणि बद्धकोष्ठतेपासून आराम देतात. एवढेच नाही तर आयुर्वेदिक चूर्णामध्ये बद्धकोष्ठतेवर घरगुती उपाय म्हणून काळे मीठ वापरले जाते.

मधुमेहामध्ये फायदेशीर

काळ्या मिठाचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठीही चांगले मानले जाते. वास्तविक मधुमेहींना केवळ साखरच नाही तर मीठाचे प्रमाणही कमी करण्याचा सल्ला दिला जातो. जर आपण काळ्या मिठाबद्दल बोललो तर त्यामध्ये सोडियमचे प्रमाण सामान्य मिठापेक्षा कमी असते.

पचनसंस्था सुधारते

काळ्या मिठाच्या नियमित सेवनाने पचनाशी संबंधित अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. पोटात जळजळ किंवा बद्धकोष्ठता असल्यास काळ्या मीठाचे सेवन करणे फायदेशीर आहे. काळ्या मिठामध्ये असलेले लोह देखील छातीत जळजळ शांत करण्यास मदत करते.

वजन कमी करण्यात फायदेशीर

काळ्या मिठाच्या सेवनाने वजन कमी होण्यास मदत होते. लठ्ठपणा कमी करण्यासोबतच यामध्ये असलेले अँटी ओबेसिटी गुणधर्म व्यक्तीला इतर अनेक आजारांपासून वाचवतात.

ब्लड प्रेशर

काळ्या मिठाचे सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. यामध्ये असलेले सोडियम क्लोराईड रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. याशिवाय काळ्या मिठात सोडियमचे प्रमाणही कमी असते, जे रक्तदाबाच्या रुग्णांसाठी फायदेशीर असते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel