Vegetable Pasta: मुलांसाठी बनवा टेस्टी आणि हेल्दी पास्ता, नोट करा ही सोपी रेसिपी
Healthy Recipes for Kids: जर तुम्हाला तुमच्या मुलांना असे काही खायला द्यायचे आहे जे हेल्दी आणि चविष्ट असेल, तर व्हेजिटेबल पास्ताची ही सोपी रेसिपी ट्राय करा.
Vegetable Pasta Recipe: घरातील स्त्रिया अनेकदा त्यांच्या मुलांची तक्रार करतात की मुले सगळ्या भाज्या खात नाही. मुलांच्या या सवयीमुळे त्यांच्या शरीरात आवश्यक पोषक तत्वांची कमतरता असू शकते. जर तुम्हालाही तुमच्या मुलाच्या या सवयीने त्रास होत असेल आणि त्यांच्यासाठी काहीतरी हेल्दी आणि टेस्टी बनवायचे असेल तर व्हेजिटेबल पास्त्याची ही सोपी रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्ही हे मुलांना शाळेत टिफिनमध्ये देऊ शकता. शिवाय संध्याकाळी किंवा सकाळच्या नाश्त्यातही देऊ शकता.
ट्रेंडिंग न्यूज
व्हेजिटेबल पास्ता बनवण्यासाठी साहित्य
- २ कप व्हीट पास्ता
- १ बारीक चिरलेला टोमॅटो
- १ बारीक चिरलेला कांदा
- १ बारीक चिरलेली सिमला मिरची
- १ टीस्पून लसूण-आले पेस्ट
- अर्धा छोटा कप टोमॅटो प्युरी
- अर्धी छोटी कप क्रीम
- २ चमचे बटर
- चवीनुसार मीठ
- अर्धा टीस्पून ओरेगॅनो
- अर्धा टीस्पून चिली फ्लेक्स
व्हेजिटेबल पास्ता बनवण्याची पद्धत
व्हेजिटेबल पास्ता बनवण्यासाठी प्रथम एका भांड्यात पाणी टाकून त्यात पास्ता, थोडे मीठ आणि ४-५ थेंब तेल टाकून पास्ता उकळायला ठेवा. यानंतर दुसर्या पॅनमध्ये बटर टाका आणि त्यात लसूण-आले पेस्ट, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि सिमला मिरची टाका. तुम्ही यात गाजर, स्वीट कॉर्न आणि ब्रोकोली सुद्धा टाकू शकता. आता या सर्व भाज्या घालून हलक्या भाजून घ्या. यानंतर पॅनमध्ये टोमॅटोची प्युरी घाला आणि भाज्यांसह चांगले मिक्स करा. आता पॅनमध्ये मीठ, चिली फ्लेक्स, ओरेगॅनो घालून मिक्स करा. यानंतर त्यात क्रीम घाला आणि चांगले मिक्स करा. आता या उकळलेला पास्ता टाकून चांगले टॉस करा. तुमचा टेस्टी व्हेज पास्ता तयार आहे.