मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Garlic Chicken: वीकेंडला बनवायचंय खास तर ट्राय करा गार्लिक चिकनची ही रेसिपी

Garlic Chicken: वीकेंडला बनवायचंय खास तर ट्राय करा गार्लिक चिकनची ही रेसिपी

Hiral Shriram Gawande HT Marathi
May 20, 2023 11:43 AM IST

Weekend Special Recipe: सुट्टीच्या दिवशी काहीतरी वेगळं खायचा विचार करत असाल तर गार्लिक चिकनची ही रेसिपी ट्राय करा. लंच किंवा डिनरमध्ये तुम्ही हे बनवू शकता.

गार्लिक चिकन
गार्लिक चिकन

Garlic Chicken Recipe: जर तुम्ही नॉन व्हेज लव्हर असाल आणि वीकेंडला काहीतरी नवीन करून पाहत असाल तर या वीकेंडला गार्लिक चिकनची ही टेस्टी रेसिपी नक्की ट्राय करा. ही रेसिपी चिकनच्या रेग्युलर रेसिपीपेक्षा एकदम वेगळी आणि टेस्टी आहे. यात चिकनचे तुकडे दही, लसूण आणि हिरव्या मिरच्यांसोबत कोळशावर ग्रील केले जाते. चला तर मग जाणून घेऊया गार्लिक चिकन कसे बनवायचे.

गार्लिक चिकन बनवण्यासाठी साहित्य

- १७० ग्रॅम बोनलेस चिकन

- १ टीस्पून चीज (किसलेले)

- २ चमचे लसूण (चिरलेला)

- १ टीस्पून आले-लसूण पेस्ट

- कोथिंबीर (चिरलेली)

- १ टीस्पून हिरवी मिरची पेस्ट

- १ टीस्पून क्रीम

- ४ चमचे दही

- १ टीस्पून काजू पेस्ट

- चवीनुसार मीठ

- काळे मीठ चवीनुसार

- १/२ टीस्पून गरम मसाला

- १/२ टीस्पून चाट मसाला

- १ टीस्पून बटर

गार्लिक चिकन बनवण्याची पद्धत

गार्लिक चिकन बनवण्यासाठी सर्वप्रथम चिकनला दह्यात मेरिनेट करण्यासाठी चिरलेले लसूण, आल्याची पेस्ट, काजूची पेस्ट आणि हिरवी मिरची पेस्ट एकत्र करून चिकनमध्ये मिक्स करा. आता चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, गरम मसाला, काळे मीठ, चाट मसाला, क्रीम आणि चीज टाका. आता हे मॅरिनेट केलेले चिकन साधारण अर्धा तास तसेच ठेवून द्या. चांगले मॅरिनेट झाल्यानंतर चिकनला बटर लावा आणि १० ते १५ मिनीट कोळशाच्या तंदूर मध्ये ग्रील करा. तुमचे गार्लिक चिकन तयार आहे. गरमा गरम सर्व्ह करा.

WhatsApp channel