मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Mango Mojito: कडक उन्हात थंडावा देईल मँगो मोइतो, खूप सोपी आहे रेसिपी

Mango Mojito: कडक उन्हात थंडावा देईल मँगो मोइतो, खूप सोपी आहे रेसिपी

Hiral Shriram Gawande HT Marathi
May 19, 2023 06:53 PM IST

Summer Drink Recipe: उन्हाळ्यात आंब्याचे विविध पदार्थ आवडीने खाल्ले जातात. पण तुम्ही कधी मँगो मोइतो ट्राय केला आहे का? चला तर मग यंदा नक्की करून पहा मँगो मोइता या सोप्या पद्धतीने.

मँगो मोइतो
मँगो मोइतो

Fresh Mint Virgin Mango Mojito Recipe: जेव्हा तुम्ही बाहेर जेवायला जाता तेव्हा तुम्ही व्हर्जिन मोइतो ड्रिंकबद्दल ऐकले असेलच. असे सुद्धा होऊ शकते की ते तुमच्या आवडत्या ड्रिंक्सपैकी एक आहे आणि तुम्ही ते नेहमी ऑर्डर करता.जर असे काही असेल तर तुम्ही त्याचे नवीन रूप देखील ट्राय करू शकता. सध्या उन्हाळा आहे आणि तुम्ही भरपूर आंबे खात असाल किंवा मँगो शेक पित असाल. पण जर तुम्ही व्हर्जिन मोइतो मँगो मोइतोच्या रूपात बनवलात तर चव डबल होईल. मँगो मोइतो हे उन्हाळ्यासाठी एक परफेक्ट ड्रिंक आहे, जे तुमच्या नॉर्मल मोइतोला आणखी स्वादिष्ट बनवेल. चला पाहूया कसे बनवायचे.

मँगो मोइतो बनवण्यासाठी साहित्य

- मँगो पल्प

- क्रश्ड आइस

- पुदीना

- लिंबाचा रस

- लिंबाच्या स्लाइस

- सोडा

- साखर (चवीनुसार)

- काळे मीठ (चवीनुसार)

मँगो मोइतो बनवण्याची पद्धत

मँगो मोइतो बनवण्यासाठी सर्वप्रथम आंब्याचे साल काढून कापून घ्या आणि त्याची प्युरी बनवून घ्या. आता एक ग्लास मध्ये लिंबूचे छोटे छोटे ४ ते ६ तुकडे आणि ८ ते १० पुदिन्याचे पाने टाका आणि नीट कुस्करून घ्या. जेव्हा लिंबू आणि पुदिन्याच्या पानांचा रस निघू लागेल तेव्हा त्यात आंब्याची प्युरी आणि साखर टाकून मिक्स करा. आता या तयार झालेल्या मिश्रणात चिमुटभर काळे मिठ, क्रश्ड आइस आणि सोडा वॉटर टाका आणि नीट मिक्स करून घ्या. आता लिंबूचे स्लाइस आणि पुदिन्याच्या पानांनी गार्निश करा आणि थंड थंड सर्व्ह करा.

WhatsApp channel

विभाग