मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Summer Special Recipe: दही टाकून बनवा कांद्याची टेस्टी भाजी, पोळीसोबत लागते अप्रतिम

Summer Special Recipe: दही टाकून बनवा कांद्याची टेस्टी भाजी, पोळीसोबत लागते अप्रतिम

Hiral Shriram Gawande HT Marathi
May 19, 2023 11:55 AM IST

Veg Recipe: उन्हाळ्याच्या हंगामात जेव्हा तुम्हाला काही मसालेदार खावेसे वाटत नसेल तेव्हा तुम्ही कमी मसाल्यांची टेस्टी कांद्याची भाजी बनवू शकता. दही मिसळून बनवलेली ही भाजी चवीला अप्रतिम लागते.

कांद्याची भाजी
कांद्याची भाजी

Curd Onion Bhaji Recipe: कडाक्याच्या उन्हामुळे अनेकांना काही खावेसे वाटत नाही. या ऋतूमध्ये लोकांना अनेकदा थंड पदार्थ खाणे-पिणे आवडते. जर तुम्हाली या ऋतूत मसालेदार पदार्थ खाण्यास नको वाटत असेल तर कमी मसाल्यात चविष्ट कांदा करी बनवू शकता. ही कांद्याची भाजी तुम्ही दही घालून बनवू शकता. उन्हाळ्यात दही मिसळून बनवलेली ही भाजी अप्रतिम लागते. तुम्ही ही भाजी पोळी किंवा पराठ्यासोबत सर्व्ह करू शकता. जाणून घ्या ही भाजी कशी बनवायची.

Bakarwadi Recipe: चहाची मजा डबल करा कुरकुरीत बाकरवडीसोबत, नोट करा झटपट होणारी रेसिपी

कांद्याची भाजी बनवण्यासाठी तुम्हाला लागेल...

- लहान कांदे

- दही

- तेल

- जिरे

- हिरवी मिरची

- टोमॅटो प्युरी

- अख्खी लाल मिरची

- आले लसूण पेस्ट

- मीठ

- लाल तिखट

- हळद

- धने पावडर

- भाजलेली बडीशेप

- मेथी दाणे पावडर

- गरम मसाला

कोथिंबीर

Summer Special Drink: कडक उन्हाळ्यात थंडावा देईल मसाला ताकाची ही रेसिपी, दिवसभर राहिल कूलनेस

कसे बनवावे

- भाजी बनवण्यासाठी कढईत तेल गरम करून त्यात जिरे, लाल मिरची, हिरवी मिरची, आले लसूण पेस्ट घाला. थोडा वेळ भाजून घ्या.

- नंतर त्यात टोमॅटो प्युरी घालून मिक्स करा.

- आता या पेस्टमध्ये मीठ, तिखट, हळद, धने पूड, भाजलेली बडीशेप आणि मेथीदाणे पावडर आणि गरम मसाला घाला. नीट भाजून घ्या.

- मसाला चांगला भाजल्यावर त्यात दही घालावे. मसाल्यापासून तेल वेगळे होईपर्यंत थोडा वेळ भाजून घ्या.

Dum Aloo Recipe: रात्रीच्या जेवणासाठी झटपट बनवा बटाट्याची ही भाजी, सगळे खातील आवडीने

- मसाला तयार झाल्यावर त्यात कांदा घालून झाकण ठेवून थोडा वेळ शिजवून घ्या. मध्ये मध्ये ढवळत राहा.

- कांदा शिजल्यावर चमच्याने मॅश करून त्यात हिरवी कोथिंबीर घालून सजवा.

WhatsApp channel

विभाग