Bakarwadi Recipe: चहाची मजा डबल करा कुरकुरीत बाकरवडीसोबत, नोट करा झटपट होणारी रेसिपी
Tasty Snacks Recipe: संध्याकाळी चहासोबत काहीतरी स्नॅक्स खायला सगळ्यांनाच आवडते. तुम्हाला काहीतरी कुरकुरीत खायचे असेल तर बाकरवडीची ही रेसिपी ट्राय करा.
Crispy Bakarwadi Recipe: महाराष्ट्रीयन स्नॅक्स बाकरवडी ही फक्त महाराष्ट्रायपुरती मर्यादीत नाही तर भारतातील अनेक राज्यातील लोक देखील हे आवडीने खातात. संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी खायचा विचार करत असाल तर बाकरवडी हे तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. बाजारात मिळणारी बाकरवडी घरी बनवायला देखील सोपी आहे. मुख्य म्हणजे हे तुम्ही बरेच दिवस प्रिजर्व करू शकत असल्याने रोज रोज नाश्ता बनवायचा, तसेच दुपारी, संध्याकाळी लागणाऱ्या थोड्याशा भुकेचा प्रश्न सुटतो. चला तर मग वाट कसली पाहत आहे, जाणून घ्या घरच्या घरी सोप्या पद्धतीने कुरकुरीत व टेस्टी बाकरवडी कशी बनवायची.
ट्रेंडिंग न्यूज
Summer Special Drink: कडक उन्हाळ्यात थंडावा देईल मसाला ताकाची ही रेसिपी, दिवसभर राहिल कूलनेस
बाकरवडी बनवण्यासाठी साहित्य
बाकरवडीच्या वरच्या लेअरसाठी
- १ कप मैदा
- २ चमचे बेसन
- ओवा
- चिमूटभर हळद
- तळण्यासाठी तेल
बाकरवडीच्या स्टफिंगसाठी
- लिंबाचा रस
- नारळाचे कीस
- १ टीस्पून तीळ
- साखर चवीनुसार
- १ टीस्पून धने पावडर
- बडीशेप पावडर
- तिखट
- जिरे
- हळद
- मीठ
Dum Aloo Recipe: रात्रीच्या जेवणासाठी झटपट बनवा बटाट्याची ही भाजी, सगळे खातील आवडीने
बाकरवडी बनवण्याची पद्धत
बाकरवडी बनवण्यासाठी सर्वप्रथम मैदा आणि बेसन गाळून घ्या. त्यात मीठ, ओवा, हळद आणि थोडेसे तेल टाकून मिक्स करून घ्या. नंतर थोडे थोडे पाणी टाकून कणीक सारखे मळून घ्या. आता हे कणीक सेट होण्यासाठी अर्धा तास झाकून बाजूला ठेवून द्या. आता एक पॅन घ्या. त्यात नारळाचे कीस, तीळ, धने पावडर, बडीशेप पावडर, तिखट, जिरे, हळद, मीठ टाकून हे सर्व साहित्य ड्राय रोस्ट करून घ्या. हे रोस्ट झाल्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये टाका आणि साखर टाकून ते बारीक करून घ्या. यात लिंबाचा रस आणि थोडेसे पाणी टाकून चांगले मिक्स करून घ्या.
Chutney Recipe: तुम्ही क्वचितच खाल्ली असेल अशी कोथिंबीर टोमॅटोची चटणी, खूप सोपी आहे ही रेसिपी
आता त्या मळून ठेवलेल्या पिठाचे छोटे गोळे करून पुर्या लाटून घ्या. पुरीमध्ये स्टफिंग टाका आणि नंतर ते रोल करून घ्या. आता पाण्याच्या सहाय्याने दोन्ही बाजूंनी कडा चिकटवा. नंतर चाकूच्या मदतीने रोलचे गोल तुकडे करा आणि तळहाताने दाबून चपटा करा. आता कढईत तेल गरम करून त्यात तयार बाकरवडी टाकून तळून घ्या. हलका गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळा आणि बाहेर काढा आणि गरम सर्व्ह करा. हे तुम्ही भरपूर दिवस प्रिजर्व करू शकता. ठंड झाल्यानंतर देखील ते तेवढेच टेस्टी लागतात.