मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Fasting Recipe: उपवासाला बनवा राजगिरा हलवा, नोट करा ही सोपी रेसिपी

Fasting Recipe: उपवासाला बनवा राजगिरा हलवा, नोट करा ही सोपी रेसिपी

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 22, 2023 06:35 PM IST

Chaitri Navratiri 2023: नवरात्रीच्या उपवासात काही गोड खायची इच्छा असेल तर राजगिरा हलवा बनवा. ट्राय करा ही सोपी रेसिपी.

राजगिरा हलवा
राजगिरा हलवा

Rajgira Halwa Recipe: नवरात्रीमध्ये अनेक लोक उपवास करतात. उपवासासाठी अनेक पदार्थ बनवले जातात. साबुदाणा, भगर यासोबत काही गोड खायची इच्छा होत असेल तर राजगिराचा हलवा बनवा. हा हलवा खायला जेवढा टेस्टी आहे तेवढाच तो बनवायला सोपा आहे. जाणून घ्या राजगिरा हलवाची रेसिपी.

ट्रेंडिंग न्यूज

राजगिरी हलवा बनवण्यासाठी आवश्यक साहित्य

- राजगिरा पीठ

- तूप

- साखर

-ड्राय फ्रूट्स

- पाणी

राजगिरा हलवा बनवण्याची पद्धत

उपवासासाठी बनवल्या जाणार्‍या राजगिरा हलव्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला एक वाटी राजगिरा पीठ, एक वाटी तूप, एक वाटी साखर, २ वाट्या पाणी आणि मूठभर चिरलेले ड्रायफ्रुट्स घ्यायचे आहेत. यानंतर सर्वप्रथम पाणी आणि साखर मिसळून साखरेचा पाक तयार करा. आता कढईत थोडे गाईचे तूप टाका आणि त्यात पीठ सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. यानंतर साखरेचा पाक घालून चांगले शिजवावे. साखरेचा पाक पिठात मिसळला की त्यात चिरलेले ड्रायफ्रुट्स घालून मिक्स करा. तुमचा चविष्ट राजगिरा हलवा तयार आहे.

WhatsApp channel

विभाग